Ajay Devgn And Kajol | घरात कोणाचं चालतं या प्रश्नावर अजय देवगणने दिले काजोल समोर ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाइन – Ajay Devgn And Kajol | आपल्या अभिनयाच्या व सौंदर्याच्या जोरावर अनेक दशके बॉलीवुडवर (Bollywood) राज्य करणारी काजोल ही कायम तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. काजोल ही दमदार अभिनेत्री तर आहेच पण त्याचबरोबर ती उत्तमरित्या घराच्या जबाबदाऱ्या पार पडताना दिसून येते. तिच्या आणि अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn And Kajol) स्ट्रॉग नात्याची प्रचिती अनेक शो मध्ये प्रेक्षकांना आली आहे. नुकतेच एका शोमध्ये हे दोघे एकत्र प्रोमोशन करताना दिसले. यावेळी अजयला घरी कोणाचे चालते असे विचारण्यात आले असता त्याने दिलेल्या मिश्किल उत्तराने सर्वत्र हशा पिकला.

अभिनेत्री काजोल ही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पदार्पण करणार आहे.
तिची आगामी वेबसिरीज (Webseries) द ट्रायल प्यार, कानून, धोखा (The Trial Pyaar, Kanun, Dhoka) यामुळे ती सध्या चर्चेमध्ये असून या वेवसिरीजची सहनिर्मिती अजय देवगणने केली आहे. या वेबसिरीजच्या ट्रेलर लॉन्चला काजोल सोबत अजयनेही हजेरी लावली. यावेळी त्यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अजय काजोलबद्दल खिल्ली उडवताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये, अजयला विचारण्यात आले की घरी निर्णय कोण घेते ? तू का काजोल? या प्रश्नाचे अजय देवगणने दिलेले उत्तर ऐकून उपस्थित लोक हसू लागले. अजयने हा प्रश्न विचारणाऱ्याला विचारले की, तुझ लग्न झाले आहे का? तुमच्या इथे निर्णय कोण घेते. जो विवाहित आहे, त्यांना या प्रश्नाचे उत्तर माहित आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, उत्तर एकच असेल. अजयच्या या उत्तराने सर्वत्र एकच हशा पिकला. अजयचा हा मिश्किल अंदाज अनेकांना भावत आहे.

आगामी ‘द ट्रायल प्यार, कानून, धोका’ ही वेबसिरीज ‘द गुड वाईफ’ चे (The Good Wife) भारतीय व्हर्जन आहे.
बनिजय आशिया आणि अजय देवगण फिल्म्स निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शन द फॅमिली मॅन लेखक-दिग्दर्शक
सुपरण एस. वर्मा (Suparna S. Verma) यांनी केले आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा असून यामध्ये काजोलने
नयोनिका सेनगुप्ता या एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. काजोल बरोबर या वेबसिरीजमध्ये शीबा चड्ढा
(Sheeba Chadha), जिशू सेनगुप्ता (Jishu Sengupta), एली खान (Eli Khan), कुब्बरा सैत (Kubra Sait)
आणि गौरव पांडे (Gaurav Pandey) हे कलाकार दिसणार आहेत.( Ajay Devgn And Kajol)

Web Title :   Ajay Devgn And Kajol | ajay devgn made a funny comment on kajol at trailer launch event of the trial know what he said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Financial Literacy and Cyber ​​Security | आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प

Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण

NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी