Financial Literacy and Cyber ​​Security | आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार

मुंबई : Financial Literacy & Cyber ​​Security | गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे (Maharashtra Govt). यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग (Department of Higher Education), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE – National Stock Exchange of India Ltd) आणि मनि बी प्रा. लि. (MoneyBee Institute Pvt Ltd) यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. (Financial Literacy & Cyber ​​Security)

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी (IAS Vikas Chandra Rastogi), मनि बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दानी (Shivani Dani), नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवस्थापक अमिश पटेल (Amish Patel), श्रीराम कृष्णन (Sriram Krishnan), संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे. (Financial Literacy & Cyber ​​Security)

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि मनि बी प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यात आर्थिक साक्षरता विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असणार आहे.

यामध्ये शेअर बाजारात (Investment In Share Market) गुंतवणूक कशी करावी, आर्थिक गुंतवणुकीची कशी खबरदारी घ्यावी आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डिजीटल सिस्टीम सुरक्षितता (Digital System Security) आणि सायबर हल्ले (Cyber Attack) रोखण्यासाठी
आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षीत आणि प्रशिक्षीत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

Web Title :  Financial Literacy & Cyber ​​Security | Maharashtra State Govt Tripartite Agreement on Financial Literacy, Cyber ​​Defence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’; फडणवीसांपेक्षा, शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनेकडून जाहिरातबाजी

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प

Maharashtra Cabinet Decision | पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ