NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – NCP MP Supriya Sule On Farmer Protest | दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmer Protest On Delhi Border) सुरु असताना भारत सरकारने (Govt Of India) काही विरोधी ट्वीटस् हटविण्यासाठी दबाव आणला होता. असा खुलासा ट्वीटरचे तत्कालीन सीईओ जॅक डॉर्से (Former Twitter CEO Jack Dorsey) यांनी केला आहे. हे अत्यंत धक्कादायक वास्तव असून या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हायला हवी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे (Demand Towards PMO) केली आहे.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/supriya_sule/status/1668527505106673664?t=3FxFeqw7KjYMpu-uAFBHhQ&s=08

प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयालाच टॅग करत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टिका करणारा प्रत्येक आवाज दाबण्यासाठी दबाव होता तसेच सरकारचे ऐकले नाही तर भारतातील ट्वीटरचे कार्यालय देखील बंद करण्याच्या धमक्या दिल्याचे जॅक यांचे म्हणणे आहे. हे आरोप अतिशय गंभीर आहेत. देशातील लोकशाही व्यवस्थेला धोका तर आहेच शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच देखील आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (NCP MP Supriya Sule On Farmer Protest)

या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती पद्धतीने चौकशी होणे अतिशय गरजेचे आहे. ट्वीटरला खरोखरच धमक्या
दिल्या गेल्या असतील तर संबंधित व्यक्तींवर कारवाई देखील व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title : NCP MP Supriya Sule On Farmer Protest | A case of pressure and intimidation on Twitter during the farmers’ agitation should be investigated; MP Supriya Sule’s demand to the Prime Minister’s Office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’; फडणवीसांपेक्षा, शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेनेकडून जाहिरातबाजी

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प

Maharashtra Cabinet Decision | पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ