Video : आजोबांना जाऊन २४ तासही झाले नाहीत तोवरच अजय-काजोलच्या लेकीने केली ‘सलाॅन’ वारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचं सोमवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत वरचढ होत होती. सांताक्रुझच्या सूर्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८५ वर्षांचे होते.

वीरू प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक होते. त्यांच्यावर विलेपार्लेच्या पवनहंस स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वीरु यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर २४ तासानंतर अजय आणि काजोल यांची लेक आणि वीरू यांची नात निसा ही बांद्रामधील एका सलूनमध्ये आपल्या मैत्रींसोबत मजा-मस्ती करताना दिसली. त्यामुळे नेटेकऱ्यांनी तिली ट्रोल केले आहे. आजोबांना जाऊन २४ तास झाले आणि ही मजामस्ती करते, असं म्हणून तीला हिनवलं गेलं.

एकीकडे अजय देवगण आणि काजोल वडिल गेल्याच्या दुःखात होते. तर निसा ही हसत-खिदळत होती. तर बॉलिवूडचे स्टार अजय आणि काजोल यांचे सांतवन करत होते. निसा ही अजय काजोलची मोठी मुलगी आहे. मात्र तिला असं पाहून त्यांनाही आवडणार नाही. निसाचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, वीरु देवगण हे प्रसिद्ध स्टंट आणि अ‍ॅक्शन कोरिओग्राफर होते. त्यांनी ८० हून जास्त सिनेमांसाठी अ‍ॅक्शन कोरिओग्राफी केली आहे. याशिवाय ‘हिंदुस्तान की कसम’ नावाच्या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. वीरू हे शांत होते. त्यांना पार्टी किंवा सार्वजनिक कार्यक्रमात जाणं फारसं पसंत नव्हतं. वीरू यांना शेवटचं अजयच्या ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या स्क्रीनिंगला पाहण्यात आलं होतं.