Ajay Devgn | अजय देवगनला विचारला प्रश्न, नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांच्यात कोण मजबूत? जाणून घ्या अभिनेत्याचे उत्तर

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  नुकताच अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) चा भुज (Ajay Devgan) चित्रपट रिलिज झाला आहे. या चित्रपटानंतर अजय देवगनच्या अशा अनेक कमेंट आल्या आहेत, ज्या चर्चेत आहेत. या चित्रपटाची कथा 1971 च्या भारत-पाक युद्धावरील (1971 Ind-Pak war) आहे. यावर अजयने (Ajay Devgn) भारताचा इतिहास आणि पंतप्रधानांशी संबंधित काही प्रश्नांवर उत्तरे सुद्धा दिली आहेत. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्याला विचारले गेले की इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोण मजबूत पंतप्रधान आहेत (Who is the strongest Prime Minister, Indira Gandhi or Narendra Modi )?

भुज द प्राईड ऑफ इंडिया (Bhuj The Pride of India) बाबत मुलाखती दरम्यान अजय देवगन (Ajay Devgan) ला विचारले गेले की, 1971 मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या.
तेव्हा पाकशी युद्ध झाले आणि नरेंद्र मोदींच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाला.
तुझ्या हिशेबाने दोघांपैकी कोण जास्त मजबूत आहे? यावर अजय देवगनने म्हटले.
तुम्ही दोघांची तुलना करू शकत नाही.
त्यावेळी त्यांनी जे केले ते योग्य होते. आज जे मोदी करत आहेत ते योग्य आहे.
दोन लोक आणि दोन स्थितीची तुम्ही तुलना करू शकत नाही.

देशाचा इतिहास लपवला

अजय देवगनने एका चर्चेत हे सुद्धा म्हटले की, देशाचा इतिहास लपवला गेला.
त्याने म्हटले, भारताचा खरा इतिहास समोर आणणे खुप आवश्यक आहे जेणेकरून सध्याच्या पीढीला समजावे की देशासाठी कुणी-कणी बलिदान दिले.
इतके वर्ष इंग्रज राहिले, त्यांनी इतिहास दाबला. अगोदर मुघलांनी आपल्या राजांनी जे केले होते, ते दाबले. यामुळे आज आपल्या इतिहासाच्या पुस्तकात परदेशी इतिहास जास्त आहे.

 

काय आहे भूजमध्ये

भुज चित्रपट अभिषेक दुधैया यांनी दिग्दर्शित केला आहे.
यामध्ये अजय देवगन, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्तची प्रमुख भूमिका आहे.
1971 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तान लष्कराच्या हल्ल्यात भुज एयरबेस पूर्णपणे उध्वस्त झाला होता. स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने एयरस्ट्रिप पुन्हा तयार केली होती.

 

Web Title : ajay devgn new film bhuj actor on narendra modi indira gandhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Delhi suicide | सर्वोच्च न्यायालयासमोर महिलेसह पुरुषानं घेतलं स्वतःला पेटवून; अन्…

BJP MLA Gopichand Padalkar | ‘शरद पवारांचे OBC प्रतिचे प्रेम आज उफाळून आलंय’

Ashraf Ghani | ‘कॅश’ने भरलेल्या 4 कार आणि हेलिकॉप्टर घेऊन काबुलमधून पळाले राष्ट्रपती अशरफ गनी : रिपोर्ट