
Ajit Pawar | ‘मी लपून का जाऊ? मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता’, शरद पवारांच्या भेटीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याशी झालेल्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्याच्या बैठकीचं काही मनावर घेऊ नका. पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग (Maharashtra Political News) देऊ नका, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मी बैठकीला गेलो हे मान्य करतो. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.
पुण्याच्या बैठकीमुळे कोणताही संभ्रम नाही. शरद पवारांनी स्वत: सांगितलं की ते पवार कुटुंबातले ज्येष्ठ आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. घरातल्या व्यक्तीला भेटणं यात विनाकारण त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी दिली जात आहे. तिथे फार काही वेगळं घडलं असं समजण्याचं कारण नाही, असही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.
मी लपून का जाऊ?
बैठकीला लपून गेल्याची चर्चा असल्याबाबत विचारणा केली असता अजित पवार यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. मी तिथे भेटायला लपून गेलो नाही. मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे. मला काय गरज आहे लपूवन जायची? मी कुणाच्या घरी गेलो, तर मी तिथून कधी बाहेर निघायचं हा माझा अधिकार आहे. मी बैठकीला गेलो हे मान्य करतो ना मी, असं अजित पवार म्हणाले.
चोरडिया यांचेच घर का?
भेटीसाठी चोरडियांच्याच घराची निवड का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. चोरडिया यांच्या दोन पिढ्यांशी आमचे संबंध आहेत.
चोरडियांचे वडील शरद पवारांचे वर्गमित्र होते. शरद पवार व्हीएसआयचा (Vasantrao Sugar Institute(VSI)
कार्यक्रम संपवून येणार होते. माझा कार्यक्रम चांदणी चौकात होता. तो कार्यक्रम संपवून माझे पुढचे कार्यक्रम होते. चोरडियांनी शरद पवारांना जेवायला बोलावलं होतं. जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांसोबत होते. कारण तेही त्या व्हीएसआयच्या कमिटीत आहेत. मीही आहे. पण नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) चांदणी चौकातल्या (Chandni Chowk) एका कार्यक्रमाबाबत मला महिन्याभरापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे मला त्या मीटिंगला जाता आलं नाही. व्हीएसआयमध्ये मी सांगितलं की मी येऊ शकत नाही. त्यामुळे जर दोन दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तीने जेवायला बोलावलं तर त्यातून वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही, असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
मी नात्यानं शरद पवार यांचा पुतण्या लागतो. त्यामुळं कारण नसताना याला काहीजण वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देत आहेत.
त्यातून समज गैरसमज निर्माण होत आहेत.
जनतेला मी सांगेन की इथून पुढे आम्ही केंव्हाही भेटलो तर त्यातून कोणताही अर्थ काढू नका.
ती कौटुंबिक भेट असते, असंही अजित पवार म्हणाले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
15 August Rashifal : मेष आणि वृषभसह या चार राशीचे भाग्य ग्रह राहतील प्रबळ, वाचा दैनिक भविष्य