Ajit Pawar | ‘मी बिलंदर शब्द तुमच्यासाठी वापरणार नाही, पण…’ अजित पवारांचा फडणवीसांना खोचक टोला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. अधिवेशनाच्या अंतीम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खोचक शब्दात टोले लगावले. तसेच यावेळी बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोचक सल्लाही दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात वेगवेगळ्या मुद्यांवरुन तुफान फटकेबाजी करत सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.

भाजप आमदार टाळ्या वाजवत नाहीत

मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या प्रस्तावासंदर्भात अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणात भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांवर सत्ताधारी बाकांवरील भाजपचे आमदार (BJP MLA) टाळ्या वाजवत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच देवेंद्रजी, तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री होता. एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी, करोडोंचे प्रस्ताव आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सगळ्यांनी मिळून किती टाळ्या वाजवल्या हो? तुमचा तर चेहरा मी सारखा बारकाईनं बघत होते, असं अजित पवार म्हणाले.

हे महाराज रेटून बोलतात

तुम्ही कशाला सांगताय कॅबिनेटला पाठवतो वगैरे. मी कॅबिनेटमध्ये करुन घेणार, अस म्हणा ना. एक संदेश गेला पाहिजे सगळीकडे. हे महाराज उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलतायत. तुम्ही मात्र जरा मागे मागेच येतायत, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

अशा गोष्टी करु नका

यावेळी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला. अशा गोष्टी करु नका, म्हणत मिश्किल शब्दांत विनंतीही केली. वैनगंगा आणि नळगंगाचं तर या महाराजांनी (देवेंद्र फडणवीस) लक्षवेधीच्या वेळी सांगून टाकलं. खरंतर अशा गोष्टी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसहीत बाकीच्यांनी न सांगता त्या फक्त मुख्यमंत्र्यांना शेवटच्या दिवशी जारी करण्यासाठी ठेवायच्या असतात, असा सल्ला त्यांनी दिला.

मी बिलंदर म्हणणार नाही, पण…

देवेंद्रजी, तुम्ही उगीच हात चोळल्यासारखं करु नका. मी बिलंदर म्हणणार नाही तो शब्द याठिकाणी चालणार नाही.
पण तुम्ही अत्यंत हुशारीने सगळ्या गोष्टी सांगता. सगळे खुशीत असतात. असं करु नका.
आम्ही अडीच वर्ष जवळ जवळ बसलो होतो. त्यामुळे मला कधीकधी फार दु:ख होतं, वेदना होतात.
त्यामुळे असं करु नका, असं अजित पवार म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar mocks devendra fadnavis cm eknath shinde assmebly winter session

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shruti Haasan | श्रुती हासनने सिनेसृष्टी बद्दल केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली “मी कधीही दिखावा केला नाही…”

Uddhav Thackeray | त्यांची नजर वाईट आहे, त्यामुळे आरएसएसने काळजी घेण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या आरएसएस कार्यालय भेटीवर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य…