Ajit Pawar | अजितदादांच्या आईने व्यक्त केली इच्छा, माझे शेवटचे दिवस उरलेत, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं

पुणे : Ajit Pawar | दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री (Chief Minister) व्हावं, असे वाटते. दादावर लोकांचं प्रेम आहे, पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की, दादाने मुख्यमंत्री व्हावे, अशी स्पष्ट इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मातोश्री आशाताई पवार (Ajit Pawar Mother Asha Pawar) यांनी बोलून दाखवली आहे. राज्यातील २,३६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (Grampanchyat Election) आज मतदान होत आहे. यात पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधील काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी आशाताई पवार यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

बारामतीमधील काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गट विरूद्ध भाजप यांच्यात चुरशीची लढत आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून काटेवाडीत मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. यावेळी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु झाली आहे.

सध्या अजित पवार (Ajit Pawar) हे डेंग्यूने आजारी आहेत. अंगात अशक्तपणा असल्यामुळे ते रविवारी काटेवाडी ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी आले नाहीत. मात्र, अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार सकाळी लवकरच काटेवाडी येथील मतदान केंद्रावर आल्या आणि मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी पत्रकारांनी आशाताई पवार यांना अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता त्या स्पष्टपणे म्हणाल्या, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं, असे वाटते.
दादावर लोकांचं प्रेम आहे, पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की, दादाने मुख्यमंत्री व्हावे.
आता शेवटच आहे, मी आता ८६ वर्षांची आहे. त्यामुळे माझ्यादेखतच मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते.
कोणास ठाऊक इच्छा पूर्ण होईल की नाही. लोकांचं काय सांगता येतं?

अजित पवारांच्या तब्येतीची माहिती देताना आशाताई पवार म्हणाल्या, दादा आजारी आहे, त्याला अशक्तपणा आला आहे.
त्यामुळे तो मतदानाला आला नाही. मी १९५७ सालापासून मतदान करत आहे. यंदा मतदानासाठी लोकांचा छान प्रतिसाद आहे.
काटेवाडीत पूर्वी काहीच नव्हते, पण आता काटेवाडीत सांगता येणार नाहीत, इतके बदल झाले आहेत.
येथील लोकही आमच्यावर प्रेम करतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ईडीच्या तुरुंगातून सुटका करतो, 15 कोटी द्या, तोतया ईडी अधिकाऱ्याचा आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीला फोन