Ajit Pawar | अजित पवारांना ‘अर्थ’ खाते देण्याला शिवसेनेचा होतोय विरोध?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. पण तरीही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विशिष्ट खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अर्थ, ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला व बालविकास आणि अल्पसंख्याक खाती ही राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचा क्रीडा आणि शिक्षण खात्यातील एका खात्यावर डोळा असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्याकडे अर्थखाते (Finance Minister) देण्यास शिवसेनेचा (Shivsena) तीव्र विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये पेच निर्माण केल्याची तक्रार शिंदे गटातील मंत्र्यांनी केली होती. त्यामुळे यावेळी त्यांनी सावध पवित्रा घेत निषेध व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अजित पवार वगळता इतर आठ मंत्र्यांना अद्याप मंत्रालयात (Ministry) कार्यालय किंवा निवासस्थान मिळालेले नाही. त्यामुळे हे नऊ मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय मंत्रालयात दिसत नाहीत. भाजप आणि शिंदे गटातील (BJP and Shinde Group) उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यानंतरच खात्यांची वाटणी करावी, असा सूरही भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांकडून दिसत आहे. त्यामुळे खाते वाटपाचा मुद्दा आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे.

आठवडाभरापूर्वी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Deputy Chief Minister) शपथ घेतली.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनीही शरद पवारांचा (NCP Chief Sharad Pawar) पाठिंबा सोडून मंत्रिपदाची शपथ घेतली.
मात्र अद्यापही त्यांच्या खात्यांचे वाटप झालेले नाही. तसेच शिंदे गटातील आणखी काही आमदार अजूनही मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत.
अजित पवार यांच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रीपदासाठी दावे केले होते.
तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या एक ते दोन दिवसांत आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
त्यानंतरच राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) मंत्र्यांची खाती वाटली जातील.

Web Title : Ajit Pawar | ajit pawar ncp wants finance energy housing ministry shivsena opposes to giving finance ministry maharashtra ncp crisis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पत्नीच्या भावानेच फसवलं ! सॉफ्टवेअर इंजिनिअरची 28 लाखाची घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

Maharashtra Cabinet Expansion | भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र; मंत्रिमंडळातील चौघांना मिळणार डच्चू?, ‘या’ भागातील मंत्र्यांचा समावेश

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या

Weekly Horoscope (10-16 July) : हा आठवडा सर्वांसाठी कसा असेल, वाचा १२ राशींचे साप्ताहिक राशिफळ

Depression | ‘या’ बियांच्या सेवनाने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’, जाणून घ्या त्याचे फायदे