Depression | ‘या’ बियांच्या सेवनाने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’, जाणून घ्या त्याचे फायदे

नवी दिल्ली : Depression | शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य देखील खूप महत्वाचे आहे. कारण जर तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी नसाल तर तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. शरीर नीट कार्य करू शकणार नाही (Depression). त्यामुळे तणाव टाळा आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवा. भोपळ्याच्‍या बिया मानसिक स्‍वास्‍थ्‍य कसे ठीक ठेवू शकतात ते जाणून घेवूया (Pumpkin Seeds for Depression).

 

डिप्रेशन दूर करण्यासाठी खा भोपळा

भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी (vitamin C) असते, जे न्यूरोट्रांसमीटर (neurotransmitter) नावाचे ब्रेन केमिकल बनते. हे मूड सुधारण्यास मदत करू शकते, यासोबतच भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम (Magnesium) देखील भरपूर असते, जे मेंदूचे कार्य सुधारते. भोपळ्याच्या बियांमधील झिंक (Zinc) देखील तणाव कमी करते. (Depression)

 

भोपळ्याच्या बियांचे इतर फायदे

झोपेसाठी उपयोगी

भोपळ्याच्या बियांचा आहारात (diet) समावेश केल्यास झोप येण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने चांगली झोप येते. ज्यामुळे मानसिक समस्या (mental problem) होण्याची शक्यता कमी असते. तुम्ही निरोगी राहता.

 

हृदय ठेवा निरोगी

भोपळ्यामध्ये भरपूर फायबर (fiber) असते, जे पचनक्रिया (digestion) सुधारते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ब्लड प्रेशर (blood pressure) देखील वाढत नाही, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

 

Web Title : Depression | consumption-of-pumpkin-seeds-will-remove-your-depression

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा