Ajit Pawar | ‘इंदू मिल येथील स्मारक लवकर पूर्ण व्हावे, कोणीही राजकारण करू नये’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन अजित पवार (Ajit Pawar) यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. यामध्ये कोणीही कोणतेही राजकारण करू नये. आज आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज तुमचा माझा भारत देश एकसंघ आहे आणि यापुढेदेखील राहील. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे वातावरण आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते आहे. सर्वधर्म समभाव हीच भूमिका घेऊन बाबासाहेबांनी शेवटपर्यंत त्यांची वाटचाल केली होती.

आमचे महाविकास आघाडी सरकार असताना, आम्ही काम करताना सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी
धनंजय मुंडे यांच्याकडे होती. त्यावेळी मी अर्थमंत्री होतो. मी त्यांना नेहमी सांगायचो,
की इंदू मिल इथे होणारे बाबासाहेबांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
मात्र, आता सरकार बदलले आहे. आम्ही आता विरोधी पक्षात आहोत.
आमची अपेक्षा आहे की या नवीन शिंदे फडणवीस सरकारने या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर
हे स्मारक पूर्ण करावे, असे यावेळी पवार यांनी नमूद केले.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar pay tribute to babasaheb ambedkar on paharinirvan day ask government to complete work of indu mill smarak

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mirzapur Season 3 | मिर्झापूरचा 3 रा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने दिले संकेत

Pune Accident News | दरी पुलाजवळ ट्रेलर उलटला; अडकलेल्या चालकाची अग्निशमन दलाकडून सुटका

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात