Ajit Pawar | त्याबद्दल मला प्रशिक्षण मिळेल का आणि ते मोफत की फी लागणार? अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच राज्यातील अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. सध्याच्या सरकारमधील पालकमंत्र्यांबाबत (Guardian Minister) बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण (Training) कधी मिळेल आणि ते मोफत आहे का काही फी लागणार आहे? असं त्यांना विचारतो आणि ज्ञानात भर पाडून घेतो, असा टोला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका करताना एक जिल्हा सांभाळण सोपं नाही, फडणवीस सहा जिल्हे कसे सांभाळणार आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना प्रशिक्षण देऊ, असा टोला लगावला होता. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती देवीच्या फोटोबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. मात्र यातून आता राष्ट्रवादीने (NCP) हात झटकल्याचे पहायला मिळत आहे. देवी सरस्वतीच्या फोटोवरुन भुजबळांनी जे वक्तव्य केलं ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असे अजित पवार यांनी दिली.

बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एका कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ही मारहाण योग्य वाटत नाही. मतदारांना चांगली लोकं निवडून यावी,
असं वाटतं. लोकांना मुस्काटात मारणारी आणि बंदूक काढणारी लोकं नको असतात, असे पवार म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar taunt devendra fadnavis maharashtra political Marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics | NCP च्या महिला नेत्याचा BJP मध्ये प्रवेश, बारामतीमध्येच शरद पवारांना मोठा धक्का!

RBI Hike Repo Rate | सणासुदीपूर्वी RBI चा पुन्हा झटका, रेपो रेट 0.50 टक्के वाढला, कर्ज महागले