Ajit Pawar And Devendra Fadnavis | अजितदादा देवेंद्र फडणवीसांची जागा घेणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar And Devendra Fadnavis | आज विधासभेत बहुमताचा ठराव जिंकल्यानंतर राज्यात अधिकृतपणे भाजप आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे नवे सरकार स्थापन झाले आहे. आता राज्याचा नवा विरोधी पक्षनेता कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या विरोधी पक्षनेता पदासाठी अजित पवार यांचे नाव चर्चेत आहे. कारण 53 आमदार असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. यापूर्वी शिवसेनेचे आमदार जास्त होते मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवेनेचे 39 आमदार फुटले आहेत. (Opposition Leader Of Maharashtra)

 

काल रविवारी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांना विधानसभा विरोधी पक्ष नेते पद देण्यात यावे अशी मागणी उपस्थित आमदारांनी केली. या पदाला अजित पवार योग्य न्याय देऊ शकतात, असे मत आमदारांनी व्यक्त केले. (Ajit Pawar And Devendra Fadnavis)

 

राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता कोण असेल, हे ठरवणार आहे.

 

दरम्यान या बैठकीत राज्यातील नवीन सरकार कधीही पडू शकते, मध्यावधी निवडणुकीसाठी तयार रहा असे संकेत स्वपक्षाच्या आमदारांना शरद पवार यांनी दिले आहेत.
यावेळी शरद पवार यांनी शिंदे गटात नाराजी असल्याचे म्हटले.
पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही.
अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे.

पवार पुढे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते.
भाजपाच्या गटामध्येही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद न मिळता उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने नाराजी आहे.
भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे.

 

Web Title :- Ajit Pawar And Devendra Fadnavis | ncp ajit pawar may get position of opposition leader of maharashtra ncp mla demands infornt of sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’ योगासनांच्या सरावाने करा, राहील ताकद आणि चैतन्य

 

Pune Crime | हडपसर परिसरातील पादचार्‍यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुंडाची टोळी जेरबंद

 

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या