Ajit Pawar – Deepak Mankar | पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुण्यात; शहराध्यक्ष दिपक मानकर, पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar – Deepak Mankar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ते आज (शुक्रवारी) पुणे दौऱ्यावर आले आहेत. अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्री नियुक्ती झाल्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि शहराध्यक्ष दिपक मानकर व पुणे शहर उपाध्यक्ष दत्ता प्रतापराव सागरे )Datta Sagare) यांनी अजितदादांचा जाहीर सत्कार केला. यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (Ajit Pawar – Deepak Mankar)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील काही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे 4 ऑक्टोबरला खांदेपालट केली. तर काही ठिकाणी नव्याने पालकमंत्र्यांची नेमणूक केली. त्यानुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आले आहे. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. (Ajit Pawar – Deepak Mankar)

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील सर्कीट हाऊस येथे पीएमआरडीए, जिल्हा परिषद, महावितरण, क्रीडा विद्यापीठ याबाबत अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय पुण्यातील विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका घेणार आहेत. अजित पवार पुण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक मानकर व उपाध्यक्ष दत्ता सागरे
यांनी सक्रीट हाऊस येथे जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांना शाल श्रीफळ,
पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जाहिर सत्कार केला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | सावत्र पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Drug Case | ड्रग्स प्रकरणातील आरोपी अभिषेक बलकवडेच्या घरातून कोटयावधी रूपयाचं सोनं जप्त,
पोलिसांनी केलं ‘एवढे’ किलो Gold हस्तगत