Ajit Pawar | अजित पवारांचा निर्णय देवेंद्र फडवणीसांनी घ्यायला लावला मागे; नक्की कोणत्या उपमुख्यमंत्र्यांकडे आहे ‘पॉवर’

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यामध्ये ‘ट्रीपल इंजिन’ सरकार राज्य करत आहे. महायुतीच्या या सरकारमध्ये आता एकमेंकाना शह देण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्याला एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) हे एक मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) असे दोन उपमुख्यमंत्री आहे. अजित पवार हे पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यापासून ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहे. फडणवीसांसोबतच अजित पवार यांनी देखील कामाचा सपाटा लावला आहे. अशामध्येच चंद्रकांत पाटील व अजित पवार (Chandrakant Patil VS Ajit Pawar) यांच्यामध्ये पुणे जिल्ह्यावरुन शीतयुद्ध सुरु आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना त्यांचा निर्णय मागे घेण्यास लावले आहे. त्यामुळे एका उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना मान्य नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

राज्य़ाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखानदारीच्या संबंधीत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. यामध्ये एनसीडीसीने (National Cooperative Development Corporation) मंजूर केलेले 545 कोटींचे कर्ज हवे असल्यास कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामुहिक जबाबदारीच हमीपत्र द्यावे, कारखान्याच्या जागेवर सातबाराचा बोजा चढवावा तसेच ग्राहक खत दस्तावेजावर हस्ताक्षराचे अधिकार सरकारला द्यावेत असे नवे निर्बंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्यांवर लावले होते. या निर्णयामुळे कारखानदारांच्या अडचणी वाढल्या आणि काही भाजपाच्या कारखानदारी करणाऱ्या नेत्यांही या निर्णयास विरोध करण्यास सुरुवात केली. यानंतर अजित पवार यांनी आपला हा निर्णय आठ दिवसांनंतर मागे घेतला आहे.

अजित पवारांचा साखर कारखान्याबाबतचा (Ajit Pawar New Decision For Sugar factory) निर्णयामध्ये अनेक नवीन नियम घालण्यात आले होते. पवारांच्या निर्णयानुसार, कर्ज घेताना कारखान्याच्या संचालकानी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीच हमीपत्र द्यावे तसेच ग्राहक खत दस्तावेजावर हस्ताक्षराचे अधिकार सरकारला द्यावेत असे नियम होते. त्याचबरोबर कर्ज वसुली न झाल्यास कारखान्याच्या मालमत्तेच्या विक्रीतून कर्जाची वसुली करण्यात येईल आणि कर्ज हे फक्त संचालक मंडळाचा ठराव देणाऱ्या कारखान्यांना प्राप्त होईल. तसेच कारखान्याच्या जागेवर सातबाराचा बोजा चढवावा असे नवीम निर्णय अजित पवार यांनी घालून दिले होते. पण नंतर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर अजित पवारांचा हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

हा कारखानदारीचा अजित पवारांचा (Ajit Pawar) निर्णय आठ दिवसांत मागे घेण्यात आल्याचा फायदा अनेक भाजपा
(BJP Maharashtra) नेत्यांना झाला आहे. भाजपामध्ये अनेक नेते या साखर कारखानाशी निगडित आहे.
भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना आहे.
यामध्ये त्यांची गुंतवणूक 34.74 कोटी रुपये आहे. तसेच भाजपा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik)
यांचा देखील 126.38 कोटींची गुंतवणूक असलेला भीमा सहकारी साखर कारखाना आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil) हे देखील कारखानदारीशी संबंधित
असून त्यांची शंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये 123.42 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
याचबरोबर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचा 150 कोटींचा
शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना आहे. भाजप आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar)
शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये 50 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर