मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar Group Reply Nitesh Rane | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन वाद पेटला आहे. या टीकेवरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पडळकरांनी अजित पवार यांच्यावर ‘लांडग्याचं पिल्लू’ म्हणत बोचरी टीकाही केली होती. पडळकरांविरोधात अजित पवार समर्थकांकडून राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. या वादात आता भाजप आमदार नितेश राणे यांनी उडी घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (Ajit Pawar Group Reply Nitesh Rane)
काय म्हणाले नितेश राणे?
आमदार नितेश राणे म्हणाले, अजित पवार हे राज्याचे नेते आहेत. राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपाची युती आहे. राज्यात मविआ सरकार असताना आणि अजित पवार महायुतीत नव्हते तेव्हा संजय राऊत हे सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत होते. सुप्रिया ताई 70 हजार कोटींच्या कारवाईची संसदेत मागणी करतात आणि दुसरीकडे गोपीचंद यांनी टीका केल्यावर बोलतात. गोपीचंद पडळकर यांच्यावर जी टीका आज होते तशी टीका संजय राऊत यांच्यावर का झाली नाही? सिल्व्हर ओकची संजय राऊत यांना मुक्त सहमती होती का? जो न्याय संजय राऊतांना लावला तोच न्याय पडळकरांना लावावा. संजय राऊत यांना टीका करायला कुणी लावत होते? असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar Group Reply Nitesh Rane)
नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं…
नितेश राणे यांच्या टीकेला अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर एकाच माळेचे मणी आहेत. टीका करताना आपली भाषा संवैधानिक रहावी. नारायण राणे लघू आणि मध्यम उद्योगात आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकले नाहीत, ही संविधानिक टीका झाली. आणि नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही व्यक्तीगत टीका झाली. त्यामुळे आमच्या नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना त्याच भाषेत, त्याच वेळी समजेल असं उत्तर दिलं जाईल, असा इशारा सूरज चव्हाण यांनी दिला आहे.
काय म्हणाले पडळकर?
गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update