Nitesh Rane | सुप्रिया सुळेंनी टीका केली पडळकरांवर…प्रत्युत्तर दिले आ. नितेश राणेंनी; म्हणाले – संजय राऊतांवर…

मुंबई : Nitesh Rane | अजित पवारांना मी सिरीयसली घेत नाही, लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू आहे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. सुप्रिया सुळे यांनाही त्यांनी लबाड लांडग्याची लेक, म्हटले होते. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पडळकर यांच्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेत भाजपाला फटकारले होते. यावरून आता आ. नितेश राणे यांनी खासदार सुळे यांना प्रश्न विचारला आहे. (Nitesh Rane)

आमदार नितेश राणे म्हणाले, अजित पवार यांच्यावर संजय राऊत हे सातत्याने टीका करत होते. सुप्रिया ताई ७० हजार कोटींच्या कारवाईची संसदेत मागणी करतात. दुसरीकडे गोपीचंद यांनी टीका केल्यावर बोलतात. गोपीचंद पडळकर यांच्यावर जी टीका आज होते तशी टीका संजय राऊत यांच्यावर का झाली नाही? सिल्व्हर ओकची संजय राउत यांना मुक्त सहमती होती का? संजय राऊत यांना टीका करायला कुणी लावत होते, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला आहे. (Nitesh Rane)

नितेश राणे म्हणाले, आमदार रोहित पवार आणि सुप्रिया ताई अजित पवार यांचा द्वेष करतात. संजय राऊत यांना त्यावेळी सुपारी दिली होती, असा आरोप राणे यांनी केला आहे.

पडळकर काय म्हणाले…

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्याच सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवले नाही का, असे विचारल्यावर पडळकर म्हणाले, मी त्यांना सिरीयसली घेत नाही.

तसेच पडळकर म्हणाले, अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. पडळकरांनी सुप्रिया सुळे यांनाही पडळकरांनी लबाड लांडग्याची लेक, म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आक्रमक झाले आहेत.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे…

दरम्यान, या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुर्दैव एका गोष्टीचे वाटते की, अजित दादा हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. विशेष म्हणजे ते आज भाजपासोबत सत्तेत आहेत. तरीही त्यांचा मित्र पक्ष त्यांच्याबद्दल असे बोलतो. भाजपाने याचे उत्तर द्यायला हवे. तुम्ही एवढ्या मोठ्या मनाने अजित पवारांना सत्तेत सोबत घेतले. मग, ते अजित पवारांचा अपमान करण्यासाठी घेतले का? असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, ही कुठली पद्धत आहे, स्वत:च्या सहकारी पक्षनेतृत्त्वाबद्दल बोलायची, हे दुर्दैवी असून अजित पवारांचा हा अपमान आहे.

पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य – फडणवीस

यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मला असे वाटते की,
गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी करणे हे चुकीचे आहे, तिन्ही पक्षातील नेत्यांनी,
कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे.
अशाप्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police | गणेश भक्तांसाठी पुणे पोलिसांकडून ‘गणेशोत्सव 2023 डिजिटल रोड मॅप’ लाँच (व्हिडीओ)

Supriya Sule | अजित पवारांचा अपमान करण्यासाठी सोबत घेतलं का? पडळकरांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला थेट सवाल