Ajit Pawar | अजित पवारांनी आरक्षणाचा मुद्दा जोडला लोकसंख्येशी; कुटुंब नियोजनावरून टोलेबाजी, म्हणाले – ”देवाची कृपा नसते…”

माढा : Ajit Pawar | जसजशा पिढ्या वाढतात तसे शेतीचे तुकडे पडत जातात. शेतकरी अल्पभूधारक होतो. कोणी थांबायलाच तयार नाही. स्वातंत्र्यावेळी आपण ३५ कोटी होतो, आता १४० कोटी झालो. चौपटीने लोकसंख्या वाढली. देवाची कृपा.. देवाची कृपा…काही देवाची कृपा नसते. आपलीच कृपा असते. कोणत्याही जाती धर्म, पंथात काही सांगितलेले नाही. यामुळे सर्व समाजांनी दोन मुलांवर थांबायला हवं, असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा लोकसंख्येशी जोडला. ते आज माढा येथील सभेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ५२ टक्क्यांच्या आतच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मराठा आरक्षणाची गेल्या ६३ वर्षांत कधी मागणी झाली नव्हती. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) असताना आरक्षणाच्या मागणीने डोके वर काढले होते.

पृथ्वीराज चव्हाणांच्या (Prithviraj Chavan) काळात आरक्षण द्यायचा निर्णय झाला. जो सल्ला देण्यात आला त्यानुसार आरक्षण दिलेही. पण ते कोर्टात टिकले नाही. नंतर फडणवीस यांचे सरकार आले. त्यांनी दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात (High Court) टिकले, पण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) टिकले नाही.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी देखील मराठा समाजाचा आहे. दुसऱ्या समाजाचा नाही.
मलाही समाजातील गरीब वर्गाला आरक्षण मिळावे असे वाटते. आमच्या मुलामुलींना आरक्षणाची गरज नाही.
पण समाजातील एका वर्गाला आरक्षणाची गरज आहे. कुणबी प्रमाणपत्र द्या, असे जरांगे पाटलांची मागणी आहे.
ओबीसीत ३५० जाती आहेत, त्यात कुणबीदेखील आहेत. विदर्भात देशमुखांना आरक्षण आहे.
निजामशाहीतील रेकॉर्ड तपासायला सांगितले आहे. तोही प्रयत्न सुरू आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, आता दिलेल्या आरक्षणाला धक्का न देता आरक्षण द्यायचे आहे.
नाही तर ५२ टक्के समाज बिथरेल. समजून घेण्याची मानसिकता मराठा तरुण-तरुणींमध्ये राहिली नाही.
कुणालाही नाऊमेद करण्याचा आमचा प्रयत्न नाही. आर्थिकदृष्ट्या मागासांना १० टक्के आरक्षण दिल्याने
ते आता ६२ टक्क्यांवर गेले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खेड शिवापूर, हवेली परिसरात घरफोडी करणारा सराईत चोरटा गजाआड, पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त