Pune Crime News | खेड शिवापूर, हवेली परिसरात घरफोडी करणारा सराईत चोरटा गजाआड, पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खेड शिवापूर, हवेली परिसरातील अपार्टमेंट मधील बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून 9 गुन्हे उघडकीस आले असून 6 लाख 64 हजार 500 रुपये किंमतीचे 150 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत. (Pune Crime News)

खेड शिवापूर आणि हवेली परिसरात झालेल्या घरफोडीच्या घटनांचा तपास करताना, या सर्व घरफोडी बंद फ्लॅटमध्ये दिवसा झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर दिवसा चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती घेण्यात आली. तसेच चोरी झालेल्या घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. दरम्यान, 3 सप्टेंबर 2023 मध्ये जामीनावर बाहेर आलेल्या सराईत चोरट्याने हे सर्व गुन्हे केल्याचे समोर आले. त्यानुसार आरोपीचा शोध घेत असताना 15 ऑक्टोबर रोजी आरोपी खडकवासला परिसरातील धरण चौकाजवळ बसल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सराईत गुन्हेगार अतुल उर्फ अठ्या चंद्रकांत आमले (वय-28 रा. आकाशनगर, वारजे) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने खेड शिवापूर, नांदेडगाव, डोणजे परिसरात दिवसा घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी अतुल आमले याच्यावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. घरफोडीच्या गुन्ह्यात तो तुरुंगात होता. 3 सप्टेंबर 2023 रोजी जामीनावर सुटल्यानंतर 7 सप्टेंबर 2023 रोजी खेड शिवापूर परिसरातील बंद फ्लॅटमध्ये चोरी केली. त्यानंतर नांदेडगाव, डोणजे, हिंजवडी परिसरात चोरी केली. (Pune Crime News)

आरोपीकडून 9 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अतुल आमले हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
असून त्याच्यावर कोथरुड, वारजे, दत्तवाडी, अलिबाग, रावेत पोलीस ठाण्यात यापूर्वी 23 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी राजगड पोलीस ठाण्यातील 3, हवेली 5 आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील 1 गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Pune SP Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे
(Addl SP Mitesh Ghatte) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर
(PI Avinash Shilimkar), राजगड पोलीस ठाण्याचे (Rajgad Police Station) पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप (PI Annasaheb Gholap), हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) पोलीस निरीक्षक सचिन वांगडे
(PI Sachin Wangde), एलसीबी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे (API Netaji Gandhare),
पोलीस उप निरीक्षक प्रदीप चौधरी (PSI Pradeep Chaudhary), पोलीस अंमलदार सचिन घाडगे, राजू मोमीण, अतुल डेरे,
चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, धिरज जाधव, मंगेश भगत, प्राण येवले, हेमंत विरोळे, दत्ता तांबे,
समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, अक्षय सुपे, राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ,
पोलीस अंमलदार सोमनाथ जाधव, हवेली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या पथकाने केली.
पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil – Pune News | विद्यार्थ्यांनी पर्यटन नकाशाचा अभ्यास करून महाराष्ट्र समजून घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील

Female Police Suspended In Pune | पुणे: महिला पोलीस शिपायाचे तडकाफडकी निलंबन

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा संताप, सरकार आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेऊ न शकल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढतेय…