Ajit Pawar Meets Sharad Pawar | पवार काका-पुतण्याने जनतेतील संभ्रम दूर करावा; पुण्यातील भेटीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar Meets Sharad Pawar | पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अतुल चोरडिया (Atul Chordia) यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार उपस्थित असताना अजित पवारही या बंगल्यावर उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) देखील बैठकीला उपस्थित होते. (Ajit Pawar Meets Sharad Pawar) काका-पुतण्याच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीत अशा घडामोडी घडत राहिल्यास जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल, पक्षामध्ये काय चालले आहे, हे दोघांनी सांगितलं पाहिजे. जनतेमधील संभ्रम दूर केला पाहिजे. अजित पवार यांच्यासोबत बहुसंख्येने आमदार (NCP MLA) गेल्याने कदाचित शरद पवार यांनी आपली भूमिका बदललेली असेल, असेही चव्हाण म्हणाले. (Ajit Pawar Meets Sharad Pawar)

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली.
पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही गुप्त बैठक झाली.
पुण्यातील चांदणी चौकातील कार्यक्रमाला (Chandni Chowk Bridge Inauguration)
अजित पवार उपस्थित होते. तर, आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त (Vasantdada Sugar Institute)
मांजरी येथे होते.
शरद पवार आणि जयंत पाटील मांजरी येथून निघून कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या घरी होते. दुपारी एकनंतर अजित पवारांनी त्यांचा ताफा सोडला आणि त्यांच्या गाडीतून कोरेगाव पार्कमध्ये पोहोचले होते.

कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या बंगल्यात शरद पवार आणि अजित पवार
यांची बैठक होत असल्याचे समजताच पत्रकारांनी बंगल्याबाहेर गर्दी केली.
अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली.
सुरुवातीला शरद पवार हे बंगल्याबाहेर पडले.
त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्याबाहेर पडला.
मागील काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यातच आज या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘म्हणून आम्हाला खात्री आहे की, मणिपूरमध्ये शांतीचा सूर्य नक्की उगवेल’,
आशिष शेलारांचं विधान