Ajit Pawar | पार्थ पवार – शंभूराज देसाई भेटीवर बोलले अजित पवार; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकतच अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची भेट घेतली होती. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत होत्या. त्यावर नुकतीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली होती. आता खुद्द अजित पवार (Ajit Pawar) या प्रकरणावर बोलले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुश्मन नव्हे. एकमेकांवर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामांबाबत चर्चा, संवाद हा होतच असतो. मी स्वतः मंत्री असताना अनेक राजकीय नेत्यांना भेटत होतो. अशा स्वरूपाच्या अनौपचारिक बैठकीमध्ये विकासकामाबाबत चर्चा केली जाते. आमचे पक्ष निराळे आहेत, म्हणजे आमची काही राजकीय दुश्मनी नाही. सत्ताधारी, विरोधक म्हणजे आम्ही काही शत्रू नाही, हे समजून घ्या. असे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले.

नेहमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकमेकांविरोधात भाषण करायचे. पण एकत्र भेटल्यानंतर दोघेही एकमेकांशी मैत्रीपूर्ण बोलायचे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये झालेला कार्यक्रम हा मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच झाला असून, यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले जात आहे.

दरम्यान, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पार्थ पवार आणि शंभूराज देसाई
यांच्या सभेवर भाष्य केले होते. त्यात त्यांनी पार्थ पवार हे नाराज असल्यामुळेच त्यांनी शंभूराज देसाई यांची
भेट घेतली असावी. कारण रोहित पवार (Rohit Pawar) हे विधानसभेचे सदस्य आहेत.
आणि आता महाराष्ट्र क्रिकट मंडळाचे (Maharashtra Cricket Association) अध्यक्षही ते झाले आहेत.
त्यामुळे पार्थ पवार नाराज असू शकतात. घरातून, आजोबाकडून अन्याय होत असेल म्हणूनच शंभूराज देसाई
यांची भेट घेतली असेल, पार्थ पवारांना राजकारणात स्थिर व्हायचे असेल. असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
तसे म्हणत त्यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती.

Web Title :-  Ajit Pawar | ncp ajit pawar reaction over parth pawar and shinde group shambhuraj desai meet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime | खासदार क्रीडा महोत्सवात भाजप नेत्याच्या मुलाने घातला राडा; पंच, आयोजकांना केली मारहाण (व्हिडिओ)

Sandeep Deshpande | मुंबईत कोरोनाकाळात मोठा घोटाळा; मनसे नेते संदिप देशपांडे यांचा खळबळजनक दावा, २३ जानेवारीला सादर करणार पुरावे

Pune Crime News | फेसबुक फ्रेंडने अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करुन केला अत्याचार; अल्पवयीन असल्यापासून सुरु होता प्रकार

Nagpur Crime | नागपूर हादरलं! नराधमांनी महिलेच्या मृतदेहावर केले सामूहिक अत्याचार