Sandeep Deshpande | मुंबईत कोरोनाकाळात मोठा घोटाळा; मनसे नेते संदिप देशपांडे यांचा खळबळजनक दावा, २३ जानेवारीला सादर करणार पुरावे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेची निवडणुक (Mumbai Municipal Corporation Election) कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील सगळेच पक्ष या निवडणुकीत विजय संपादित करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच मनसे नेते संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ठाकरे गटाची सत्ता मुंबई महापालिकेत असताना कोविडकाळात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे आरोप ठाकरे गटावर केले आहेत. तसेच हा घोटाळा २३ जानेवारीला सर्वांसमोर आणणार असे देखील ते (Sandeep Deshpande) म्हणाले आहेत.

नुकतचं, एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना संदिप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले की, ‘एक व्यक्ती माझ्या शाखेत आली. त्या व्यक्तीने काही कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह शाखेत दिले. त्या व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. मात्र, मी तो पेन ड्राइव्ह पाहिला, कागदपत्रे पाहिली. विरप्पन गँगने कोरोना काळात मुंबईची लूट केली. या लुटीचे ढळढळीत पुरावे या पेन ड्राइव्हमध्ये आहेत. सोमवारी २३ जानेवारी रोजी आम्ही हे सगळं माध्यमांसमोर मांडणार आहोत. तसेच पोलिसांत तक्रार देखील देणार आहोत.’ असे त्यांनी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

त्याअगोदर भाजपकडून (BJP) देखील ठाकरे गटावर (Shivsena Thackeray Faction) या
घोटाळ्यासंबंधी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजप नेते खासदार किरीट सोमय्या (MP Kirit somaiya) यांनी कोरोना काळात मुंबई महापालिकेत मोठे घोटाळे झाल्याचे म्हटले आहे. किरीट सोमय्या यांच्याकडून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी यात संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या निकटवर्तीयाला पालिकेचे कंत्राट दिले गेल्याचे आरोप केले आहेत. असं असतानाच आता संदिप देशपांडे हे कुठले पुरावे नक्की सादर करणार आहेत. आणि त्या पुराव्यांमध्ये नक्की काय असणार आहे, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :-  Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande corruption allegations on uddhav thackeray reveals on 23 january

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MPSC Exam 2023 | मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत या वर्षी भरली जाणार “एवढी” पदे

Keshav Upadhye | भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवक्तेपदी केशव उपाध्ये यांची फेरनियुक्ती

Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना