Ajit Pawar NCP Pune Protest Against Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार, अजित पवार समर्थक आक्रमक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar NCP Pune Protest Against Gopichand Padalkar | आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याचे विधान केले होते. या विधानावरुन अजित पवारांच्या समर्थकांनी पडळकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आमदार पडळकर हे जिथं दिसतील त्या ठिकाणी त्यांना चोप देणार असल्याचे संतप्त कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. (Ajit Pawar NCP Pune Protest Against Gopichand Padalkar)

आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्याच्या मावळमध्ये उमटले आहेत. अजित पवारांचे समर्थक थेट जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर उतरले आहेत. सोमाटने फाटा येथे त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. वेळोवेळी विनाकारण अजित पवारांवर भष्य करणाऱ्या पडळकरांना पुणे जिल्ह्यात फिरु देणार नाही. आता पडळकरांनी माफी मागितली तरी दिली जाणार नाही. ते दिसतील तिथं त्यांना आम्ही चोप देऊ अशी आक्रमक भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यामुळे महायुतीत संघर्ष निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Ajit Pawar NCP Pune Protest)

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

गोपीचंद पडळकर म्हणाले, धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र दिलं आहे.

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा

Ujjwal Nikam Reaction On Maharashtra Political Crisis | शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाळ कोणाचे?
उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान

Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस