Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस

Pune city BJP jumbo executive announced

राघवेंद्र मानकर, वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर, पुनीत जोशी, स्वरदा बापट, प्रमोद कोंढरे, शाम देशपांडे, मंजुषा नागपुरे, विवेक यादव, आनंद रिठे यांच्यासह इतरांवर मोठी जबाबदारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष यांचा यामध्ये समावेश आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपच्या शहराध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर धीरज घाटे शहर कार्यकारिणी कधी जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये माजी नगरसेवकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

जाहीर झालेल्या जम्बो कार्यकारिणीमध्ये 18 जणांवर शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राघवेंद्र मानकर यांच्यावर यांच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जम्बो कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस पदी 8 जणांची तर 18 जणांची चिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे. (Pune BJP)

भाजप पुणे शहर कार्यकारिणी यादी खालीलप्रमाणे…

उपाध्यक्ष

  1. विश्वास ननावरे
  2. प्रशांत हरसुले
  3. मंजुषा नागपुरे
  4. जीवन जाधव
  5. सुनील पांडे
  6. शाम देशपांडे
    7 . प्रमोद कोंढरे
  7. अरुण राजवाडे
  8. तुषार पाटील
  9. स्वरदा बापट
  10. योगेश बाचल
  11. भूषण तुपे
  12. संतोष खांदवे
  13. महेंद्र गलांडे
  14. रुपाली धाडवे
  15. हरिदास चरवड
  16. गणेश कळमकर
  17. प्रतिक देसर्डा (भा.ज.यु.मो. पुणे शहर प्रभारी)

सरचिटणीस

  1. वर्षा तापकीर ( भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी)
  2. राजेंद्र शिळीमकर
  3. रवी साळेगावकर
  4. सुभाष जंगले
  5. राघवेंद्र मानकर
    6 . पुनीत जोशी
  6. राहुल भंडारे
  7. महेश पुंडे

चिटणीस

1.कुलदीप सावळेकर

  1. किरण कांबळे
  2. किरण बारटक्के
  3. अजय खेडेकर
  4. आदित्य माळवे
  5. राहूल कोकाटे
  6. विवेक यादव
  7. उदय लेले
  8. विशाल पवार
  9. लहू बालवडकर
  10. उमेश गायकवाड
  11. सुनील खांदवे
  12. प्रविण जाधव
  13. हनुमंत घुले
  14. रेश्मा सय्यद
  15. अनिल टिंगरे
  16. आनंद रिठे
  17. दुष्यंत मोहोळ

युवा मोर्चा अध्यक्ष – करण मिसाळ
महिला मोर्चा अध्यक्ष – हर्षदा फरांदे
ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष – नामदेव माळवदे
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – भीमराव साठे
अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष – इम्तियाज मोमीन
व्यापारी आघाडी अध्यक्ष – उमेश शहा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा

Total
0
Shares
Related Posts
Mahavikas-Aghadi

Mahavikas Aghadi On Mahayuti | ‘महाराष्ट्र हा मोदी- शहा गुलामांची वसाहत’, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत’