Ajit Pawar On CM Eknath Shinde | ‘मुख्यमंत्री ज्योतिषाकडे भविष्य बघून अंधश्रद्धांना खतपाणी घालत आहेत’; अजित पवारांचा आरोप

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 21 व्या शतकात अंधश्रद्धांना खतपाणी घालत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. (Ajit Pawar On CM Eknath Shinde)

 

मुख्यमंत्री शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमात अचानक बदल केला आणि ते सिन्नरला गेले. यावेळी त्यांनी सिन्नरमध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतले. त्यावरुन विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

पवार म्हणाले की, मुख्यमंत्री अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. प्रत्येकाची कुठे ना कुठे निष्ठा असते, श्रद्धा असते. लोकांचा देवधर्मावर विश्वास असतो. त्याला माझा विरोध नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या बातम्या आल्या आहेत. प्रत्यक्ष वस्तुस्थिती मला माहीत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच या गोष्टीची स्पष्टता केली पाहिजे. ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य पाहणे म्हणजे, 21 व्या शतकात सर्व जग विज्ञानावर चालले असताना, आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखे आहे, असे पवार यावेळी म्हणाले.

आम्ही राजकीय लोक कुठेही गेलो तरी, स्थानिक देवस्थानांना भेटी देतो.
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होते तेव्हा आम्ही सकाळी लवकर जाऊन शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतो.
पंढरपूरात अधिवेशन असल्यास विठ्ठलाचे दर्शन न चुकता घेतो. जेजुरीला गेल्यावर देखील तेच करतो.
ही आपली परंपरा आहे. ती आपण जतन केली पाहिजे. त्याबद्दल सर्वांना आदर असला पाहिजे.
मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे म्हणजे खरोखरच अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखे आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात अनेक बदल होत आहेत. अशा वेळी विज्ञानाची कास आपण धरली पाहिजे.
ते सोडून पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. यावर बोलणेच नको.
आम्ही त्यांच्यासमोर आता हतबल झालो आहोत, असे पवार यावेळी म्हणाले.

 

Web Title :- ncp leader ajit pawar criticize cm eknath shinde for believing in astrology

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gulabrao Patil On Aditya Thackeray | ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती’

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू