Ajit Pawar On Lathi Charge | ‘फडणवीसांचा संबंध नसताना त्यांनी माफी मागितली’ – अजित पवार

मुंबई : Ajit Pawar On Lathi Charge | राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असून यावर सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे चित्र तयार झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा हा जालन्यातील आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जमुळे प्रकाशझोतात आला. या लाठीचार्जवरुन मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आणि विरोधकांनी गृहखात्यावर टीकेची झोड उठवली. हे प्रकरण अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यभरातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी होऊ लागली. झालेल्या या लाठीचार्जसाठी गृहमंत्रालय दोषी असून गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरु लागली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांचे वक्तव्य सध्या गाजत आहे. (Ajit Pawar On Lathi Charge)

राज्य सरकारकडून मराठा आंदोलनासंदर्भात सर्वपक्षीय बैठक देखील आयोजित करण्यात आली होती. आंदोलकांना लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जावेत हा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी देखील मागितली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भूमिका मांडली असून फडणवीसांचा संबंध नसताना त्यांनी माफी मागितली असे विधान केले आहे. (Ajit Pawar On Lathi Charge)

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमादरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक व त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्जबद्दल मत व्यक्त केले आहे. अजित पवार म्हणाले की, “या संपूर्ण मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मराठा आरक्षण देताना मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अर्थात भटके विमुक्त किंवा ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. कुणीही लाठीचार्जचं समर्थन करणार नाही” असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, “स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी माफी मागितली. वास्तविक त्यांचा काही संबंध नव्हता.
तिथल्या अधिकाऱ्यांची चूक होती. पण एकमेकांवर टोलवाटोलवी करून चालत नाही.
शेवटी समाज आपला आहे, लोक आपले आहेत, राज्य आपलं आहे हीच आपली भावना आहे”
अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची बाजू सावरत मत व्यक्त केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

Manoj Jarange-Maratha Reservation | मी दोन पावलं मागे जातोय…कारण, मनोज जरांगे यांची माहिती; आंदोलनाची पुढील दिशाही सांगितली

Pune PMC Anti Encroachment Drive | भांडारकर रस्ता व कमला नेहरू पार्क परिसरातील हॉटेल्स व कॅफेंचे अनधिकृत बांधकाम पाडले