Pune Crime News | घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेकडून 24 तासात अटक, साडेतीन लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांच्या (Pune Police Crime Branch) युनिट-6 च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून साडेतीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई हडपसर (Hadapsar) येथील इंड्रस्टीयल इस्टेट येथे करण्यात आली आहे. ओंकार सुरेश गोसावी (वय-21 रा. सहारा प्रेस्टीज शेजारी, भेकराईनगर, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात आयपीसी 454,457, 380,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरात वाढत्या जबरी चोरी, वाहन चोरी, घरफोडी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी युनिट-6 कडून मोहिम राबवण्यात येत आहे. यादरम्यान महिला पोलीस अंमलदार ज्योती काळे यांना माहिती मिळाली की, लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी ओंकार गोसावी हा हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथे थांबला असून त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली दुचाकी आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सपाळा रचून आरोपी ओंकार गोसावी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकी बाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम, वेगवेगळ्या कंपनीचे पाच मोबाईल असा एकूण 3 लाख 47 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा घडल्यानंतर युनिट -6 च्या पथकाने 24 तासात आरोपींना अटक करुन गुन्हा उघकीस आणला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल (Sr PI Rajnish Nirmal), पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, अशफाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कोंढवा परिसरात ‘भाईगिरी’ करणाऱ्या गणेश कोरडे याच्यासह इतर 2 जणांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 60 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Maharashtra Pune ISIS Module Case | पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात NIA चा मोठा निर्णय,
चार वॉन्टेड गुन्हेगारांवर ठवले लोखोंचे बक्षिस

वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्याची करोडोची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून एकाला अटक