Ajit Pawar On MSRTC Workers Strike | ‘कामगारांना ही शेवटची संधी’; अजित पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना स्पष्टच सांगितलं !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On MSRTC Workers Strike | जवळपास पाच महिन्यांपासून चालू असलेल्या एसटी संपामधील (ST Strike) कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी 31 मार्चपर्यंत येण्याचं आवाहन केलं होतं. अशातच यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एसटी संपातील कर्मचाऱ्यांना ही शेवटची संधी असल्याचं म्हटलं आहे. (Ajit Pawar On MSRTC Workers Strike)

 

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता सुटलेला असून याबाबत अनिल परब यांनी सभागृहात माहिती दिली आहे.
त्यांच्या मागण्या मान्य केल्या असून पगारवाढही करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांना ही शेवटची संधी असणार आहे.
राज्यावर आता 750 कोटींचा बोजा पडणार असून त्यांचे पगार वेळेवर करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारने घेतली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

 

31 मार्चपर्यंत कर्मचारी कामावर आले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
आज पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात (Pune Rural Police Headquarter) उभारण्यात आलेले सांस्कृतिक सभागृह, कॅन्टीन आणि गाड्यांचा लोकार्पण सोहळा अजित पवारांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही काही कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन चालू ठेवलं.
यामुळे एसटी रूळावर येऊ शकली नाही याचा ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
आता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (10th & 12th Board Exams) असल्याने खाजगी गाडीवाले विद्यार्थ्यांकडून जास्तीचं भाडं आकारत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.

 

 

Web Title :- Ajit Pawar On MSRTC Workers Strike | msrtc workers may face strict action if not resume duty
by 31 march says ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा