Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले सरकारचे अभिनंदन

मुंबई : Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | राज्य सरकारच्यावतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) वढू येथील बलिदान व समाधीस्थळाच्या कामाविषयी निवेदन करताना छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री तथा ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्वराज्यरक्षक असा केला त्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे अभिनंदन केले. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने गेल्या अर्थसंकल्पात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान
व समाधीस्थळाच्या विकासासाठी 256 कोटी निधी मंजूर केला होता. या बलिदान व समाधीस्थळाचा आराखडा सुध्दा मंजूर करण्यात आला होता. या कामाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती, त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. यावर सर्वस्तरातून नाराजी व्यक्त होत होती. तसेच विरोधी पक्षाच्यावतीने हा प्रश्न सभागृहात मांडण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना महाविकास आघाडी सरकारच्यावतीनं मंजूर केलेला आरखडा विद्यमान सरकाने काही अल्प बदल वगळता जशाचा-तसाच ठेवला असल्याचे सरकारच्यावतीने निवेदनाव्दारे सभागृहात माहिती देण्यात आली. यावेळी सरकारच्यावतीने निवेदन देताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज केला. छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे अभिनंदन केले.

Web Title : Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | Leader of Opposition Ajit Pawar congratulated the government for referring to Chhatrapati Sambhaji Maharaj as ‘Swaraj Rakshak’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना

Wardha Crime News | खळबळजनक ! पोलिस अधिकार्‍यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, प्रचंड खळबळ

Solapur Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pravin Tarde | प्रवीण तरडे यांना ’कलाजीवन गौरव’ पुरस्कार