Ajit Pawar On Vijay Shivtare | ‘तुम्ही मला मूर्ख समजू नका’, विजय शिवतारेंबाबत अजित पवारांनी मांडली भूमिका (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Vijay Shivtare | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) राज्यात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. त्यात एकनाथ खडसेंची घरवापसी. तसेच आधी आक्रमक त्यानंतर माघार घेऊन शांत झालेले विजय शिवतारे. मात्र या मुद्यांवर अद्यापही राजकीय वर्तुळात चर्चा सुरुच आहे. याबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते चांगलेच संतापले. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त भिडे वाड्यात अजित पवारांनी स्मारक स्थळाचं दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) असे आम्ही सगळ्यांनी मिळून महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचं स्मारक करायचं ठरवलं आहे. आधीच स्मारक आहे, पण जागा कमी पडतेय. त्यामुळे आसपासची जागा घेऊन तिथे काम केलं जाईल, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

निधीची अडचण भासणार नाही

भिडे वाड्यात (Bhide Wada) ज्याठिकाणी पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली होती. ती जागा देखील आता महापालिकेच्या ताब्यात आली आहे. त्याचे पाच ते सहा आराखडेही तयार झाले आहेत. या दोन्ही कामांना निधीची कमतरता भासणार नाही, ही ग्वाही सरकारकडून मी देतो असे अजित पवार यांनी सांगितले.

विजय शिवतारेंबाबत अजित पवार म्हणाले…

मागील महिन्यत चर्चेत आलेल्या विजय शिवतारेंच्या बंडखोरीच्या मुद्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) व सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह विजय शिवतारेंनीही बंडाचं निशाण फडकवून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, चर्चेअंती त्यांनी माघार घेतली. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले.

विजय शिवतारे यांनी एकानाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर मी, एकानाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस बसलो होतो तेव्हा
त्यांच्या भागातले महत्वाचे विषय माडले, ते म्हणाले की मी महायुतीबरोबर आहे.
पण ते विषय सरकारने मार्गी लावायला हवेत. त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो.
त्या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यावं. तेव्हा आम्ही तसा शब्द दिला होता.
त्यानुसार त्यांनी 11 तारखेला तिथल्या मैदानात सभा आयोजित केली आहे. त्या सभेला मुख्यमंत्री व मीही जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

तुम्ही मला मूर्ख समजू नका

यावेळी राजकीय प्रश्न विचारायचा आहे, असे माध्यमांचे प्रतिनिधी म्हणताच ‘अरे अरे अरे… कुठंही काहीही…’ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
पत्रकारांनी विजय शिवतारेंना यादरम्यान कोणाचे फोन आले होते? असा प्रश्न विचारताच अजित पवार संतापले.
तुम्ही मला मूर्ख समजू नका. मी सांगायचं तेवढं सांगितलं, मला संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं आहे तेवढं मी
बोललो आहे, असं अजित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vetal Tekdi In Pune | पर्यावरणदृष्टया महत्वपूर्ण टेकड्यांचे संवर्धन आणि संरक्षणाची ठाम भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडावी; वेताळ टेकडी बचाव कृती समितिचा पुणे लोकसभा उमेदवारांसाठी जाहिरनामा