Vetal Tekdi In Pune | पर्यावरणदृष्टया महत्वपूर्ण टेकड्यांचे संवर्धन आणि संरक्षणाची ठाम भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडावी; वेताळ टेकडी बचाव कृती समितिचा पुणे लोकसभा उमेदवारांसाठी जाहिरनामा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vetal Tekdi In Pune | शहरात व्यवस्थीत पाणी पुरवठा, शाश्‍वत वाहतूक व्यवस्थेसोबतच पर्यावरणदृष्टया अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या शहरातील टेकड्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची ठाम भूमिका व बाजू मांडणार्‍या उमेदवारालाच आमचा पाठींबा असेल, अशी अपेक्षा वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्यावतीने नागरिकांच्या जाहिरनाम्याद्वारे करण्यात आले आहे.

वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्यावतीने सुषमा दाते, प्राजक्त दिवेकर,अमेय जगताप आणि सचिन बहिरट यांनी यासंदर्भात निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. त्यामध्ये पुणे शहरातून लोकसभेत निवडून जाणार्‍या आमच्या लोकप्रतिनिधीने पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी, आणि अधिक सुखकर होण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रभावीपणे बाजू मांडावी, धोरणे ठरवावीत आणि आवश्यकते नुसार निधीसुद्धा उपलब्ध करून आणावा. शहराच्या हिताचे दोन महत्वाचे मुद्दे ज्याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे – पुरेसे पाणी आणि कार्यक्षम, शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. पुढे आमचे लोकप्रतिनिधी या नात्याने आपण शहरातील नैसर्गिक वारसा स्थळे म्हणून आमच्या टेकड्यांचे संवर्धन करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी व बाजू मांडावी. पुणेकरांचे या टेकड्यांशी एक भावनिक नाते आहे, या टेकड्यांचे संवर्धन व सौरक्षण झाले पाहिजे यासाठी अनेक वर्ष लोक प्रयत्नशील आहेत.


आमच्या लोकप्रतिनिधींनी राज्य आणि स्थानिक प्रशासनाला, मुख्य टेकड्यांमधून नियोजित ३ प्रकल्प – बालभारती रस्ता, रिंग रोड जो तीन टेकड्यांना फोडतो आणि पंचवटी पर्यंत जाणारे दोन बोगदे रद्द करण्यास भाग पाडले पाहिजे हे प्रकल्प
शहराचे पाणी, शुद्ध हवा, आणि तापमान कमी करण्याच्या मुख्य ठिकाणास बाधा पोहचवत असून टेकड्यांचे आणि पर्यायाने
शहराचे कायमस्वरूपी, कधीही भरून न येणारे नुकसान करणारे आहेत.
हे प्रकल्प केवळ खाजगी वाहनांना प्रोत्साहन देणारे असून देशासाठी बनवलेल्या राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण व पुणे
शहरासाठी बनवलेल्या सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्याच्या पूर्णपणे विरोधात आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime Branch | पिंपरी : कामगारांनीच चोरले कंपनीतील इम्पोर्टेड रबरी पार्ट, गुन्हे शाखेकडून आरोपी गजाआड; पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

Adani Group Entry In Pune | अदानी समुहाची पुण्यातील पिंपरीमध्ये मोठी गुंतवणूक, ‘या’ उद्योगासाठी फिनोलेक्सकडून २५ एकर जमीनीची खरेदी

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : दुकाने व सदनिकांचा ताबा न देता सव्वा तीन कोटींची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

Pune Lok Sabha Election 2024 | सोशल मीडिया आणि भेटीगाठींवर भर देत मुरलीधर मोहोळांचा जोरदार प्रचार, म्हणाले -”पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट…”