Ajit Pawar Road Show In Pune Rains | पुण्यात भर पावसात अजित पवारांचा रोड शो, म्हणाले ”आम्ही शेतकऱ्यांची पोरं, भिजायची सवय, लोकांना आमच्याबद्दल…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar Road Show In Pune Rains | शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti NCP Candidate) शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोड शो केला. मात्र, सायंकाळच्या या रोड शोच्या वेळी अचानक जोरदार पाऊस कोसळू लागला. मात्र, अजित पवारांनी न थांबता रोड शो सुरूच ठेवला. कोंढवा (Kondhwa), लुल्लानगर (Lulla Nagar), साळुंखे विहार (Salunke Vihar), कौसरबाग (Kausar Baugh), कात्रज गावठाण (Katraj Gaothan), कात्रज चौक (Katraj Chowk), सुखसागर नगर (Sukhsagar Nagar), कोंढवा बुद्रूक (Kondhwa Budruk), गोखलेनगर (Gokhale Nagar) आदी परिसरात हा रोड शो झाला. रोड शो ला परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.

पुण्यातील हडपसर परिसरातील (Hadapsar) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या रोड शो ला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी शिवाजी आढळराव पाटलांना यांना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन केले. आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe), योगेश टिळेकर (Yogesh Tilekar), नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire), साईनाथ बाबर (Sainath Babar) उपस्थित होते.(Ajit Pawar Road Show In Pune Rains)

यावेळी अजित पवार म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो आहोत. पावसात आम्हाला भिजायची सवय आहे. त्यामुळे पावसात रोड शो करण्याचे फार विशेष नाही. लोकांना आमच्याबद्दल विश्वास वाटतो, त्यामुळे पावसात एवढे लोक रोड शोला आले आहेत..

अजित पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे थोर विकास पुरुष आहेत.
त्यांनी देशाचा विकास गतिमान केला. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे भारताला जगात मानाचे स्थान मिळाले.
अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. ती तिसऱ्या क्रमांकावर न्यायची आहे.
देशाच्या विकासासाठी मोदींच्या नेतृत्वाखालील महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.

कार्यकर्त्यांना बजावताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या ठराविक लोकांनी काम करून चालणार नाही,
तर तळागाळातील कार्यकर्त्यांनी देखील काम केले पाहिजे. इमाने इतबारे काम करावे. कोणीही गंमत-जंमत करायचा
प्रयत्न करू नका. अन्यथा तुमचा बंदोबस्त करावा लागेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना 25 लाखांचा गंडा

Maval Lok Sabha | मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांचेकडून आढावा

Ravindra Dhangekar | विविध संस्था-संघटनांचा रवींद्र धंगेकरांना पाठिंबा