Ajit Pawar | अजित पवारांच्या अडचणी वाढणार? ईडीच्या आरोपपत्राची विशेष पीएमएलए कोर्टाकडून दखल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडवणारे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मोठ्या चर्चेत आहेत. नुकतेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) आठ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. एकीकडे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे विशेष पीएमएलए न्यायालयाने (Special PMLA Court) केलेल्या टिप्पणीमुळे अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा (Sunetra) यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीविरुद्ध ईडीच्या आरोपपत्राची (ED Charge Sheet) विशेष पीएमएलए न्यायालयाने दखल घेतली. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Cooperative Sugar Factory) गहाण मालमत्तेसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Cooperative Bank) आणि इतरांनी 826 कोटी रुपयांचे कर्ज प्रथमदर्शनी दाखवले, कारखान्याची मालमत्ता राष्ट्रवादीच्या राजकारण्यांच्या साथीदारांनी कवडीमोल भावाने संपादित केली होती आणि याचा फायदा कंपनीला झाला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दरम्यान, ईडीने राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी एप्रिल महिन्यात आरोपपत्र दाखल केले. त्याआधी स्वत: अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर या घोटाळ्यात थेट फायदा लाटल्याचा आरोप केला जात होता. परंतु, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अजित पवारांच्या नावाचा उल्लेख करण्यात न आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना या व्यवहारात फायदा झाल्याची बाब न्यायालयानेच नमूद केल्यामुळे हा अजित पवारांना धक्का मानला जात आहे.

ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये गुरु कमॉडिटी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (Guru Commodity Services Private Limited), जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड (Jarandeshwar Sugar Mills Private Limited) व सीए योगेश बागरेचा (CA Yogesh Bagrecha) या तिघंविरोधात आरोप केले. या आरोपपत्राची दखल घेत बुधवारी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे (Justice M. G. Deshpande) यांनी वरील दोन्ही कंपन्या आणि बागरेचा यांना समन्स बजावले आहे. येत्या 19 जुलै रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title :  Ajit Pawar | special pmla court says ajit pawar aid benefited in maharashtra state cooperative bank scam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा