Ajit Pawar Vs Sharad Pawar | शरद पवारांना धक्का, भोरच्या शहराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचाही समावेश

भोर : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar Vs Sharad Pawar | लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha) एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा भाव सध्या खुपच वधारला आहे. सर्वत्र पक्षप्रवेश जोरदार सुरू आहेत. आता भोरमध्ये (Bhor) शरद पवारांच्या पक्षाच्या (Sharad Pawar NCP) शहराध्यक्षानेच इतर पदाधिकाऱ्यांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यामध्ये काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचाही सहभाग आहे.(Ajit Pawar Vs Sharad Pawar)

या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील जिजाई बंगला (Jijai Bangalo) येथे प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भोर शहराध्यक्षासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी अजित पवार गटामध्ये
प्रवेश केला. हा लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला धक्का असल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक यशवंत डाळ, अनंतराव थोपटे यांचे कार्यकर्ते
असलेल्या जिल्हा दूध संघाचे संचालक दिलीप थोपटे यांचे पुतणे आणि अनंत दूधचे कार्यकारी संचालक नितिन थोपटे,
काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सोमनाथ ढवळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप शेटे यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे
माजी सदस्य चंद्रकांत बाठे, भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे, बाळासो खुटवड, गजानन आवाळे इत्यादी
यावेळी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका का केली?, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

Ajit Pawar | ‘ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार’ शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया