Ajit Pawar | मला काय करायचंय, राज ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार भडकले

ADV

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया (Industrialist Atul Chordia) यांच्या बंगल्यावर भेट झाली. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. यावर स्पष्टीकरण देताना (Maharashtra Political News) काका-पुतण्या म्हणून ही भेट झाली होती, असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर अजित पवारांना याबाबत विचारले असता शरद पवार यांनी उत्तर दिल्यानंतर मी काही बोलू इच्छित नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मनसेच्या (MNS) भाजपसोबत (BJP) येण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी थेट, माझा काय संबंध… असे म्हणत उत्तर दिले.

काय म्हणाले होते राज ठाकरे

ADV

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सांगितले की, भाजपकडून आपल्याला ऑफर आहे. परंतु मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाजप काय करणार, पुढचे गणित कसं जुळवणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही. युतीबाबत तुम्ही चर्चा करु नका. सध्या पक्ष वाढवणे हे महत्त्वाचे असल्याचे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. राज ठाकरेंच्या विधानावर अजित पवार यांना कोल्हापूर येथे पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते काहीसे चिडल्याचे पाहायला मिळाले.

मी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून…

भाजपने त्यांना ऑफर दिलीय, त्यावर मला काय करायचंय. तुम्हाला उद्या भाजपने ऑफर दिली तर,
तो तुमचा आणि भाजपचा संबंध आहे. मला काय करायचं. माझ्याशी संबंधित असलेले प्रश्न आणि राज्य सरकारशी संबंधित असलेले प्रश्न जरूर विचारा. मी राज्य शासनाचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.

पुण्यातील बैठकीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुण्याच्या बैठकीमुळे कोणताही संभ्रम नाही. शरद पवारांनी स्वत: सांगितलं की ते पवार कुटुंबातले ज्येष्ठ आहेत.
मी त्यांचा पुतण्या लागतो. घरातल्या व्यक्तीला भेटणं यात विनाकारण त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी दिली जात आहे.
तिथे फार काही वेगळं घडलं असं समजण्याचं कारण नाही, असही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

मी नात्यानं शरद पवार यांचा पुतण्या लागतो. त्यामुळं कारण नसताना याला काहीजण वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी देत आहेत.
त्यातून समज गैरसमज निर्माण होत आहेत. जनतेला मी सांगेन की इथून पुढे आम्ही केंव्हाही भेटलो तर त्यातून
कोणताही अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते, असंही अजित पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tejasswi Prakash And Karan Kundrra | तेजस्वी प्रकाशने सांगितले तिने का केले करण कुंद्रासोबतचे नाते सर्वांसमोर जाहीर; “मला ते करण्याशिवाय पर्याय…”