Ajit Pawar | “कोणतीही चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत” आढावा बैठकीमध्ये अजित पवारांचे आदेश

पिंपरी चिंचवड – पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कामाला लागले आहेत. जिल्ह्यामध्ये त्यांनी नुकतीच भेट दिली आणि पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरांना भेट देखील दिली. या पूर्वी देखील अजित पवारांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. आत्ता पुन्हा एकदा त्यांच्याकडे पदभार आला असून ते विकासकामांचा पाठपुरवठा करत आहेत. शहरातील प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर सुरु करण्याबाबत पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुचना दिल्या आहेत. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली असून रखडलेली कामे मार्गी लावताना कोणतीही चुकीची कामं खपवून घेतली जाणार नाहीत, मी कधीही चुकीच्या कामांना थारा दिलेला नाही असे अजित पवार यांनी सांगितले आहे. (Pune News)

अजित पवार यांनी जिल्ह्याची पालकमंत्री पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao), जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Collector Rajesh Deshmukh), पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महापालिका आयुक्त विकास कुमार, आमदार आण्णा बनसोडे (MLA Anna Bansode), राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहामध्ये आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी शहरातील प्रमुख प्रकल्पाची स्थिती, प्रलंबित विकासकामे, पाणीटंचाई, ड्रेनेज व वाहतुकीच्या समस्या, स्वच्छता यासह विविध विषयांची माहिती घेऊन चर्चा केली. प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश देखील दिले.

या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले,
“पिंपरी चिंचवडची रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावताना कोणतीही चुकीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत.
चुकींच्या कामांना मी कधीच थारा दिलेला नाही. शहराच्या भविष्याचा विचार करुन विकासकामांचे नियोजन करा.”
असे अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यात लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेची छापेमारी; ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक,
११ जणांची चौकशी सुरू

Maratha Reservation | मनोज जरांगेंच्या भाषणाने सरकार हादरले,
आरपारच्या लढाईची घोषणा करताच मराठा आरक्षणावर भाजपचे सूचक ट्विट