Pune Crime News | पुण्यात लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेची छापेमारी; ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक, ११ जणांची चौकशी सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लष्कराची गुप्तचर यंत्रणा (Army Intelligence) आणि पुणे पोलिसांनी (Pune Police) संयुक्त कारवाई करत हडपसर येथे छापेमारी केली. या छापेमारीत सापडलेल्या ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. तसेच इतर ११ जाणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. अचानक सुरू झालेल्या या छापेमारीमुळे अवैधपणे वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशींमध्ये खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

हडपसरच्या आदर्श नगर डोंगरात बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोर राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराची गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी राम रहीम अली शेख, बाबू मोसिन मंडल, कमरुलू रोशन मंडल, सागर आलम शेख, नजमा बाबू मंडल, आणि अली बाबू मंडल या बांगलादेशींना अटक केली. त्यांच्याकडून बनावट भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर बनावट कागत्रपदे जप्त केली आहेत. (Pune Crime News)

याशिवाय ११ बांगलादेशींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
अवैधरित्या राहात असलेल्या बांगलादेशींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी हडपसर पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले होते.
परंतु, नंतर पुरावे नसल्याचे सांगत सोडून दिले होते. त्यानंतर लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने पुरावे गोळा करून ही कारवाई केली. यात ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. तसेच त्यांच्या येथील नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | नात्याला काळीमा! पोलीस कर्मचारी आणि सख्ख्या भावाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संभाजी नगरमधील घटना

मनोज जरांगेंच्या भाषणाने सरकार हादरले, आरपारच्या लढाईची घोषणा करताच मराठा आरक्षणावर भाजपचे सूचक ट्विट

Pune Accident News | अपघाताचे सत्र सुरुच; हॉटस्पॉट ठरलेल्या नवले पुलाजवळ पुन्हा मालवाहू ट्रक उलटला

कात्रजमध्ये अग्निशमन दलाचे धाडसी कार्य; आगीमध्ये अडकलेल्या लहान मुलीचे वाचवले प्राण