Akanksha Puri | आकांशा पुरी मत्सराने गेली मिका सिंहच्या शोमध्ये अन् झाली विजेती

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आकांशा पुरी (Akanksha Puri) हि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे व चित्रपटांमुळे चर्चेत असते. आकांशा ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक फोटोशूट ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. आकांशाने तिच्या करिअरची सुरुवात एअर होस्टेस म्हणून केली होती. आता मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी असणारी अभिनेत्री आकांशा ही गायक मिका सिंह (Mika Singh) यांच्यासोबत ‘स्वयंवर मीका दी वोटी’ (Swayamvar: Mika Di Vohti) या कार्यक्रमामध्ये त्याची पत्नी झाल्यामुळे चर्चेत आली. मध्यंतरी बिग बॉस ओटीटीवरील तिच्या किसिंग प्रकरणामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. आज आकांशाचा (Akanksha Puri) वाढदिवस आहे त्यानिमित्ताने तिच्या आयुष्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री आकांशा पुरी हिचा जन्म 26 जुलै 1988 रोजी मध्य प्रदेशातील इंदौर मध्ये झाला आहे. आकांशाचे वडिल असिस्टंट पोलीस ऑफिसर होते तर आई गृहिणी होती. सुरुवातीला आकांशा पुरी ही कॅबिन क्रु म्हणून कार्यरत होती. त्यानंतर तिने आपला मोर्चा मॉडेलिंगकडे वळवला. आकांशा पुरी हिने अनेक फॅशन शो मध्ये कामं केली. पण तिने परत आपला ट्रॅक बदलला आणि ती अभिनय क्षेत्राकडे वळाली. आकांशा पुरीने मधुर भांडारकर यांच्या ‘कॅलेंडर गर्ल’ (Calendar Girl) या चित्रपटामधून बॉलीवुडमध्ये दमदार पदार्पण (Akanksha Puri Debut) केले. पहिल्यांच चित्रपटातील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आकांशा पुरीचा चाहता वर्ग देखील तयार झाला.

पण त्यानंतर आकांशा पुरी ही जास्त लाईमलाईट मध्ये आली नाही. ती पुन्हा चर्चेत आली ती म्हणजे स्वयंवर मीका दी वोटी या रिअलिटी शोमुळे. या शोमध्ये प्रसिद्ध गायक मीका सिंह ह्याच्या लग्नासाठी कोणती युवती त्याला इम्प्रेस करणारा असा हा शो होता. मीका व आकांशा (Mika And Akansha) यांची जवळ जवळ 12 वर्षांची ओळख होती. मात्र तेव्हा दोघांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली नाही. मात्र शो मधील युवती स्पर्धकांकडे पाहून तिला मत्सर निर्माण झाला. आणि तिने या मीका सिंहच्या स्वंयवरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आकांशा पुरी या शोमध्ये वाइल्ड कार्ट म्हणून सहभागी झाली. आणि आकांशा पुरी ही स्पर्धा जिंकली देखील. आकांशा पुरीच्या प्रेमामध्ये गायक मिका सिंह (Mika Singh Wife) वेडा झाला. त्या दोघांचा विवाह देखील झाला आहे.

मात्र त्या आधी अभिनेत्री आकांशा पुरी हिचे नाव पारस छाबड़ा (Paras Chhabra) सोबत देखील जोडण्यात आले होते.
पारस बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा प्रसिद्ध स्पर्धक होता. ‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेपासून
(Vighnaharta Ganesh Serial) दोघांमध्ये अफेअर सुरु झाले. मात्र बिग बॉसच्या घरात पारस व महिरा यांच्यातील
वाढणाऱ्या संबंधामुळे आकांशा व पारस मधील नाते संपुष्टात आले.
आज अभिनेत्री आकांशा पुरी (Akanksha Puri) ही तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aakash BYJU’S | आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा; इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार

Dengue Cases on the Rise in Pune: Health Authorities on High Alert