‘अक्कलपाडा’ धरणातून हजारो ‘क्युसेक्स’ पाण्याचा ‘विसर्ग’ ; नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ‘इशारा’

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – पांझरा नदीवरील पांझरा (लाटीपाडा ) मध्यम प्रकल्प व जामखेडी नदीवरील जामखेडी धरण १००% भरले आहे. नेर गावा जवळील पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरण पुर्ण क्षमतेने भरले असून १७ गेट पैकी १२ गेट दुपारी उघड्यात आले आहे. सांडव्याद्वारे अनुक्रमे ७२६० व ४६८७ एकूण ११९४७ cusecs इतका प्रवाह पांझरा नदीत येत असल्याने पांझरा नदीकाठीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

नागरिकांनी नदीकाठावर योग्य ती खबरदारी घ्यावी. नागरीकांमध्ये जनजागृती बाबत सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी सुचना टाईप करुन त्या सोशल मिडीया माध्यमातून पाठविण्यात येत आहे. सेल्फी मोह टाळावा, नदी पात्रात पाणी प्रवाह सुरु असताना नदी पात्र ओलांडू नये. असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त