Akola Police Rape Case | पोलीस कर्मचाऱ्यानेच केला सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार, स्थानिक गुन्हे शाखेत कार्य़रत असणाऱ्यावर FIR

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – Akola Police Rape Case | अकोला पोलीस दलात खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस शिपायाने आपल्याच सहकारी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेत (Local Crime Branch) कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाई शिवम दुबे (Police constable Shivam Dubey) याच्यावर अकोट शहर पोलीस ठाण्यात (Akot City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मित्राच्या पत्नीसोबत फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर आरोपी शिवम दुबे फरार झाला आहे. (Akola Police Rape Case)

अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या शिवम दुबे याने सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केले. यासोबतच पीडितेला सातत्याने ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. (Akola Police Rape Case)

शिवम याने पीडित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याच ओळखीचा आणि प्रेमाचा फायदा घेत दुबे याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यानंतर अनेक महिन्यांपासून त्याने पीडित महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. अखेर त्याच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने अकोट शहर पोलीस ठाण्यत तक्रार केली. यानंतर पोलिसांनी शिवम दुबे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मैत्री आणि मित्राचा विश्वासघात

अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यात (Ramdas Peth Police Station) मागील वर्षी दुबे हा कार्यरत होता. याच दरम्यान त्याची सोबतच्या एका पोलीस कर्मचाऱ्याशी चांगली मैत्री झाली. यातून दुबे याचे त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी येण-जाणं सुरू झाले. याच दरम्यान त्याची वाईट नजर मित्राच्या पत्नीवर पडली. त्याने आपल्या मित्राच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तीने ती स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरु झाले.

यानंतर त्या दोघांचे मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. यातच दुबे याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
कालांतराने शिवम याने मित्राच्या पत्नीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
त्याच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने मोठ्या हिमतीने हा प्रकार पतीला सांगितला.
त्यानंतर लगेच आकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी शिवम दुबे याच्यावर आयपीसी 354, 354 (अ), 354 (ड), 376(1) (ए), 376(2) (एन),
376 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता ठाकरे (API Yogita Thackeray) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | लाच स्वीकारताना पुण्यातील पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

CM Eknath Shinde On Shivsena UBT | आदानीविरोधातील शिवसेनेच्या मोर्चावर मुख्यमंत्री शिंदे बरसले,
”चाहीए खर्चा, निकालो मोर्चा! तडजोड झाली नाही की…”