Pune ACB Trap News | लाच स्वीकारताना पुण्यातील पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap News | दखलपात्र गुन्ह्यात अटक (Arrest) न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) शिरुर पोलीस ठाण्यातील (Shirur Police Station) सहायक पोलीस फौजदार राजेंद्र दगडू गवारे Rajendra Dagdu Gaware (वय-53) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने (Pune ACB Trap News) ही कारवाई बुधवारी (दि.20) शिरुर येथील तहसील कचेरीच्या समोरील एका हॉटेलमध्ये केली.

याबाबत 65 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबी कार्यालयात (Pune ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार व त्यांचे मुलाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी राजेंद्र गवारे याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे सहायक पोलीस फौजदार राजेंद्र गवारे 50 हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार दिली होती.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आज (दि. 20 बुधवार) केलेल्या पडताळणी दरम्यान तक्रारदार यांचे काम करून देण्यासाठी राजेंद्र गवारे यांनी 50 हजार रुपये लाच मागितली. तडजोड़ी अंती 10 हजार रुपये गवारे यांनी लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. पथकाने तहसीलदार कचेरी कार्यालयासमोरील हॉटेल मित्रधन येथे सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना राजेंद्र गवारे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav),
पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर (PI Praneta Sangolkar),
पोलीस शिपाई प्रवीण तावरे, पोलीस शिपाई आशिष डावकर, चालक पोलीस हवालदार काकडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

Devendra Fadnavis | मुंबईतील हिरे व्यापार सूरतला गेलाच नाही, नवी मुंबईत उभारणार देशातील आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क : फडणवीस

पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेला चोरीचा 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना केला परत