Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमार बनला अधिकृत भारतीय नागरिक

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सर्वांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. अभिनेता अक्षय कुमार याला आता भारतीय नागरिकत्व (Akshay Kumar Indian Citizenship) मिळाले आहे. या आधी अभिनेता अक्षय कुमारकडे कॅनडा या देशाचे नागरिकत्व (Akshay Kumar Canadian Citizenship) होते. त्यामुळे अनेकांच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागत होते. आता मात्र अभिनेता अक्षय कुमार हा पूर्णपणे भारतीय बनला असून त्याला गृह मंत्रालयातर्फे भारतीय नागरिकत्व (Akshay Kumar Indian Citizenship) प्रधान करण्यात आले आहे.

बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या त्याच्या प्रमाणपत्रामुळे तो ट्रेडिंगवर आला आहे. अक्षय आता भारतीय झाला असून त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व आले आहे. त्याने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या भारतीय नागरिकत्वाच्या कागदपत्रांचा फोटो शेअर करत हे जाहीर केले आहे. अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “दिल और सिटीझन दोनों हिंदुस्तानी. हॅप्पी इंडिपेंडेंस डे! जय हिंद!” असे लिहून अक्षय कुमारने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) शुभमुहूर्तावर अक्षय कुमार हा भारतीय बनला असल्याने त्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्याला कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या चित्रपटांबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अक्षयच्या चित्रपटांना (Akshay Kumar Movies) प्रेक्षकांचे अमाप प्रेम मिळत असले तरी त्याचे भारतीय नसणे हे अनेकांना खटकत होते. अभिनेता अक्षय कुमारकडे ‘कॅनडा’ देशाचे नागरिकत्व असल्याने आणि तो कॅनेडाचा पासपोर्ट वापरत असल्याने अनेक वेळा जहरी टीका केली जात होती. आता मात्र तो भारतीय (Akshay Kumar Indian Citizenship) झाला आहे. यापूर्वी देखील त्याने सांगितले की होते की, तो लवकरच कॅनेडाच्या पासपोर्टचा त्याग करणार आहे, त्याप्रमाणे त्याने भारतीय नागरिकत्व स्वीकारले आहे. अभिनेता अक्षय कुमारला यावरुन अनेकदा ट्रोल केले जात होते आता मात्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काहींनी त्य़ाच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला असला तरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘मी लपून का जाऊ? मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता’, शरद पवारांच्या भेटीवर अजित पवारांचे स्पष्टीकरण

ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या शिक्षकाविरुद्ध एसीबीकडून FIR