बीएसएफ जवानांसोबत अक्षय कुमारने साजरी केली होळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अक्षय कुमारचा बहूचर्चित चित्रपट ‘केसरी’ लवकरच रिलीज होणार आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असल्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने बीएसएफ जवानांची भेट घेतली. यावेळी त्याने जवानांसोबत डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

अक्षयचा ‘केसरी’ हा चित्रपट भारतीय जवानांनी अफगाणी सैन्याशी दिलेल्या लढ्याच्या सत्यघटनेवर आधारित युद्धपट आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. केसरीच्या प्रमोशनसाठी अक्षय आणि परिणीती चोप्राने नुकतीच दिल्लीतील कॅनॉट पॅलेस येथील बीएसएफच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी जवानांसोबत त्यांनी काही वेळ गप्पा मारल्या व जवानांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये अक्षय आणि परिणीती बीएसएफ जवानांसोबत केसरीमधील ‘सानू केंदी’वर थिरकल्याचं पाहायला मिळालं. सध्या या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/BvLoK6knX-a/?utm_source=ig_embed

 

सत्यघटनेवर आधारित युद्धपट-

भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई असे सारागढीच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. ‘केसरी’ हा चित्रपट ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या युद्धावर आधारीत आहे. १० हजार सैन्याच्या रुपानं मृत्यू समोर असतानाही न घाबरता या २१ वीरांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत आपलं नाव इतिहासात सुवर्णाक्षरात अजरामर केलं. ही सत्यघटना ‘केसरी’मध्ये पाहायला मिळणार आहे.

अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन आणि अक्षयने केली आहे. २१ फेब्रुवारीला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. २१ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये सध्या अक्षय कुमार व्यस्त आहे.

You might also like