Akshay Kumar | अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील लुक आला समोर; दिग्दर्शकाने केली खोचक टिप्पणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Akshay Kumar | सध्या महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची चर्चा जोरात होताना दिसत आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे. या गोष्टीमुळे अक्षयदेखील सध्या चर्चेत दिसत आहे. नुकतीच अक्षयने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. जी सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे, तर अक्षय कुमारने कालच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. (Akshay Kumar)

 

अक्षयने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जे पाहून काही नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत, तर काहींनी त्याला ट्रोल करण्यासदेखील सुरुवात केली आहे. त्याच्या या भूमिकेसाठी कलाकार मंडळीदेखील खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्याच्या फोटोवर अजय देवगण, शरद केळकरपासून अगदी गुलशन ग्रोवरपर्यंत अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, काही ट्रोलर्सनी मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार अजिबात शोभून दिसत नसल्याचे म्हटले आहे.

एवढेच नाही तर अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये मागे बल्बचे एक झुंबर पाहायला मिळत आहे. यावरूनदेखील महेश मांजरेकर यांना ट्रोल करण्यात येत आहे, तर प्रसिद्ध दिग्दर्शक अक्षय इंदिकर यांनीदेखील याचा एक स्क्रीन शॉट काढून सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याला कॅप्शन देत म्हटले की, “थॉमस अल्वा एडिसनच्या आधी मराठी सिनेमात ब्लबचा शोध लागला होता”. या कारणानेदेखील सध्या महेश मांजरेकर आणि अक्षय कुमार चर्चेत आहेत, तर हा फोटो पाहून एका नेटकऱ्यांनी म्हटले की, “महेश राव यांनी लावलेले दिवे पाहता मुघल स्वराज्यावर फायटर विमानांमधून चाल करून आले होते, असं दाखवलं नाही म्हणजे मिळवलं”. या व्हिडिओला आता मिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची पटकथा महेश मांजरेकर आणि पराग कुलकर्णी यांची आहे, तर चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची आहे. या चित्रपटातील संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट रिलीज व्हायच्या अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (Akshay Kumar)

 

Web Title :- Akshay Kumar | filmmaker akshay indikar post about akshay kumars chhatrapati shivaji maharaj look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Prices | ‘केंद्र सरकार दर 15 दिवसांनी कच्च्या तेलांच्या किमतीचा घेणार आढावा’ – निर्मला सीतारामन

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी