Petrol-Diesel Prices | ‘केंद्र सरकार दर 15 दिवसांनी कच्च्या तेलांच्या किमतीचा घेणार आढावा’ – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Prices) वाढत्या किमती लक्षात घेता आता यापुढे दर 15 दिवसांनी कच्चे तेल, डिझेल-पेट्रोल आणि एव्हिएशन फ्युएल (एटीएफ) वर लावण्यात आलेल्या नवीन करांचा आढावा घेण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे यापुढे केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन इंधन करावरील दराचा दर 15 दिवसांनी आढावा घेतला जाईल. (Petrol-Diesel Prices)

 

भारतात सलग 6 महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न होण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे हा उपाय काढण्यात आला आहे. “सध्या सुरू असलेली वेळ ही कठीण वेळ आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती बेलगाम झाल्या आहेत,” असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत चढ उताराचे चित्र आहे. मात्र, सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलांच्या किमती घसरल्या आहेत, असेदेखील अर्थमंत्र्यांनी सांगितले. “आम्ही निर्यातीला परावृत्त करू इच्छित नाही, तर देशांतर्गत त्याची उपलब्धता वाढवू इच्छितो. जर तेल उपलब्ध नसेल आणि निर्यात होत राहिली, तर त्याचा काही भाग आपल्या नागरिकांसाठी ठेवण्याची गरज आहे,” असेही सीतारामन यांनी नमूद केले. (Petrol-Diesel Prices)

 

मंगळवारी कच्च्या तेलांच्या किमतीत मोठी घसरण झाली आणि या वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचली.
रशिया आणि युक्रेन युद्धानंतर मार्चमध्ये तेलाच्या किमती 139 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचल्या.
मंगळवारी, ब्रेंट क्रूड 3.33 डॉलर टक्क्यांनी घसरून 79.35 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला.
त्याच वेळी, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडदेखील 2.68 डॉलर टक्क्यांनी घसरून 74.35 वर आला.

 

Web Title :-  Petrol-Diesel Prices | ‘Central government will review crude oil prices every 15 days’ – Nirmala Sitharaman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Swati Deval | ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘या’ अभिनेत्रीची सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत दिली माहिती

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी