Akshay Kumar | मला मारण्याची सुपारी अक्कीने दिली आहे…; एका अभिनेत्याचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायम त्याच्या चित्रपटांमुळे आणि सोशल वर्कमुळे चर्चेत असतो. अक्षय कुमारने टॉलेट आणि पॅडमॅन सारखे चित्रपट करून समाज प्रबोधन देखील केले आहे. मात्र एका अभिनेत्याने व चित्रपट समीक्षकाने अक्षय कुमारने (Akshay Kumar) आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

 

अभिनेता व चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान (Kamal Rashid Khan) उर्फ केआरके (KRK) याने अक्षय कुमारवर असा गंभीर आरोप केला आहे. केआरके हा कायम त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. केआरकेच्या या विधानांमुळे त्याच्या अडचणीत कायम वाढ होत असते. अक्षय कुमार सोबतच तो अनेक कलाकरांवर जहरी टीका करत असतो. केआरकेच्या ट्वीटने तो कायम कलाकरांवर गरळ ओकत असतो. त्याने आता अक्षय कुमारला धारेवर धरले असून त्याने ट्वीट केले आहे की, बॉलिवूडमध्ये (Bollywood) खरे बोलले की जीव गमवावा लागतो. सुशांत सिंगने (Sushant Singh Rajput) सुद्धा खरे बोलले आणि तो वर गेला. आता अक्की मला मारण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मी मरेपर्यंत हेच बोलणार की अक्की हा कॅनेडियन (Canadian) आहे भारतीय नाही.” असा शब्दात केआरके ने अक्षय कुमार वर घणाघाती आरोप केला आहे.

याच बरोबर त्याने आणखी एक ट्वीट केले आहे जे अक्षय बरोबर भारत सरकारवरही निशाणा साधत आहे.
त्याने लिहीले आहे की, “श्री कॅनेडियन अक्षय कुमार,
तु हे समजून घेतले पाहिजे की मला जेलमध्ये टाकून किंवा मला मारून टाकून वास्तव बदलणार नाही.
ही दुनिया तुला कायम कॅनेडियन कुमार असेच म्हणणार आहे.
आणि ज्या दिवशी केंद्र सरकार बदलेल त्याच दिवशी कुमार हा भारतातून पळून जाईल, हे लिहून ठेवा !”

 

Advt.

अभिनेता व चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ केआरके याने
अनेक गंभीर आरोप अभिनेता अक्षय कुमारवर केले आहे.
त्याच प्रमाणे त्यांच्या नागरिकत्वावर तो अनेकदा भाष्य करताना दिसतो.
केआरकेने फक्त वुबॉलीडवर नाही तर मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला आहे.
केआरके एवढ्यावरच थांबला नसून त्याने अभिनेता अक्षय कुमारच्या
मागील सर्व 10 फ्लॉप फिल्मस् ची यादी टवीट् केली आहे.
ज्यामध्ये रामसेतू (Ram Setu), रक्षाबंधन (Rakshabandhan),
सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.
आणि या य़ादीत 11 वी फ्लॉप फिल्म OMG 2 समाविष्ट होईल असे आरोप केआरके अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar) करत आहे.

 

 

Web Title : Akshay Kumar | kamaal r khan accuses akshay kumar of giving given contract
to kill him in jail viral tweet


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा