Alia Bhatt | आलिया भट्टने दिला सितेची भूमिका करण्यास नकार

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही तिच्या चित्रपटांतील भूमिका नेहमी प्रभावीपणे साकारताना दिसते. आलियाच्या राझी (Raazi), गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi), डियर जिंदगी (Dear Zindagi) आणि आरआरआर (RRR) चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या. तिच्या जीवंत अभिनयावर व फॅशनवर मोठा चाहता वर्ग फिदा आहे. तिच्या आगामी चित्रपटाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचे चाहते तिला रामायणातील ‘सीता’ या भूमिकेमध्ये (Alia Bhatt As Sita) पाहण्यासाठी आतुर झाले होते. मात्र या सर्वांना निराश करणारी बातमी समोर येत आहे. ते म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट हिने सीतेची भूमिका साकारण्यास नकार कळवला आहे.

मागील काही दिवसांपासून चित्रपट निर्माता नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या ‘रामायण’ या महत्त्वकांशी प्रोजेक्टची (Ramayana Film) सर्वत्र चर्चा आहेत. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) रामाची तर अभिनेत्री आलिया भट्ट ही सीतेची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात होते. प्रेक्षक देखील रियल लाईफ कपलला ऑयकॉनिक अशा राम-सितेच्या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र या प्रोजेक्ट मधून अभिनेत्री आलिय भट्ट (Alia Bhatt Out From Ramayana Project) बाहेर पडली आहे. चित्रपटाच्या शुटिंगच्या तारखा आणि तिचे शड्युल जुळून येत नसल्याने तिने नकार कळवला आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या तारखा जुळून येत नसल्याने तिने नितेश तिवारी यांना रामायण चित्रपटासाठी नकार दिला आहे. तिच्या या निर्णयाने अनेक प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे.

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या प्रोजेक्ट चर्चा तर आत्तापासूनच सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर रामाची भूमिका (Ranbir Kapoor As Ram) साकारणार आहे. तर दाक्षिणात्य सुपरहिरो KGF फेम यश (Actor Yash) हा रावणाची भूमिका साकारणार आहे. मात्र आता चित्रपटामधून आलिया भट्ट (Alia Bhatt) बाहेर पडली असल्याने सितेची भूमिका कोण साकारणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)

Chandrashekhar Bawankule | ‘फोडाफोडीचे संस्कार कुणाचे हे देशाला आणि…’, सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार