Chandrashekhar Bawankule | ‘फोडाफोडीचे संस्कार कुणाचे हे देशाला आणि…’, सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीन वेळा फोडण्याचा प्रयत्न केला, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पलटवार केला आहे. फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत ते देशाला आणि राज्याला माहित आहेत असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, आम्ही कुणाचीही पक्ष फोडण्याचं काम केलं नाही. ते आमचे संस्कार नाहीत. असे फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत? हे देशाला आणि राज्याला माहित आहे. त्यांना त्यांचे संस्कार लखलाभ. इतरांचे पक्ष फोडण्याचं राजकारण ज्यांनी आयुष्यभर केलं, आता तेच लोक आमच्यावर बोलत आहेत. सुप्रिया सुळे या आमच्या ताई आहेत, आम्हाला त्यांच्या विषयी आदर आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतरचा इतिहास पहावा, कुणी पक्ष फोडून सत्ता मिळवली ते समजेल, अशा शब्दात बावनकुळे यांनी सुप्रिया सुळेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

शरद पवारांचे मन परिवर्तन होईल

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मर्द मराठा नेते आहेत. त्यांनी हिंदुत्वाची साथ धरली आहे.
तर अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशाच्या कल्याणासाठी मोदींना पाठींबा दिला आहे.
शरद पवारांचं (Sharad Pawar) घर फुटलं कारण ते घर सांभाळू शकले नाहीत.
आता सुप्रिया सुळे आमच्यावर आरोप करत आहेत. परंतु मला विश्वास आहे की आगामी काळात शरद पवारांचे मनपरिवर्तन होईल आणि ते नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पाठींबा देतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

भाजपने आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केले. भाजप त्यांची रणनिती सतत बदलत राहिल,
शरद पवारंचे सर्वांशी चांगले संबंध असल्याने भाजपकडून सातत्याने ऑफर येत होत्या.
मात्र त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली नाही. तिसऱ्या वेळी भाजपने सखोल रणनीती आखली आणि त्यांना यश आलं,
ते राष्ट्रवादी फोडण्यात यशस्वी झाले. तसेच भाजपचे 105 आमदार (BJP MLA) कष्टाने निवडून आले त्यांच्याबाबत
वाईट वाटतं, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)