Alia Bhatt | आलिया भट्टची पापाराझींसोबतची ‘ही’ कृती नेटकऱ्यांना भावली; व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील सुपर क्युट अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही नेहमी चर्चेत असते. अभिनयाच्या व मेहनतीच्या बळावर तिने आपली इंडस्ट्रीमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. सध्या आलिया तिचा आगामी चित्रपट (Alia Bhatt Upcoming Movie) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान आलियाला पापराझींनी फोटोसाठी हॉटेल बाहेर घेरले होते. यावेळी आलियाने (Alia Bhatt) केलेल्या कृतीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

 

अभिनेत्री आलिया भट्ट ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिचा मोठा चाहता वर्ग असून चाहत्यांना तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते. पापाराझी तिला अनेकदा कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी गर्दी करतात. असेच काल रात्री आलिया बाहेर पडत असताना तिला पापाराझींनी घेरले. दरम्यान आलियाला एक चप्पल बाजूला पडलेली दिसली. तिने ती चप्पल कोणाची आहे असे पापाराझींना विचारले. यावेळी ती एका कॅमेऱ्यामध्ये आलियाचे फोटो काढण्यासाठी आलेल्या पापराझींची आहे हे आलियाच्या लक्षात आले. तो कॅमेरा करत असल्यामुळे त्याची चप्पल तशीच पडली होती. आलियाच्या हे लक्षात येताच तिने स्वतः हाताने उचलून ती चप्पल पापाराझीला दिली. सेलिब्रिटी असून आलियाने केलेली ही कृती नेटकऱ्यांना आवडली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही तिच्या हटके अंदाजात चाहत्यांचे मन जिंकून घेत असते. तिच्या अभिनयाचे लाखो लोक चाहते आहेत. पण आलियाचे हे वागणे सर्वांना आवडले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट ही कॅज्युयल लूकमध्ये दिसून आली. आलियाने टी शर्ट व ट्राउझर्स असा लूक केला होता. व छोटीशी स्लिंग बॅग कॅरी केली होती. तिचा लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये ती अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरने (Karan Johar) केले आहे. हा चित्रपट येत्या 28 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

 

Web Title : Alia Bhatt | alia bhatt sweet gesture wins hearts video goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा