PM Narendra Modi | भारत-फ्रान्स यांच्यात ‘युपीआय’ संदर्भात करार; पंतप्रधान मोदींची फ्रान्समधून घोषणा

नवी दिल्ली : PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे फ्रान्सच्या (France) दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी भारत आणि फ्रान्स (India and France) यांच्यात विविध करार झाले आहेत. यामध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात युपीआय (UPI) संदर्भात करार (Agreement) झाला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता भारतीयांना फ्रान्समध्ये युपीआयद्वारे रुपयात पैसे देता येणार आहेत. याची सुरुवात आयफेल टॉवरपासून (Eiffel Tower) होणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

 

दरम्यान, या युपीआय करारामुळे भारतीय नवनिर्मितीसाठी एक मोठी नवीन बाजारपेठ (New Market) उघडेल. भारताला वेगाने विकसित देश बनवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक (Investment) करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदींनी केले आहे.

 

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही युपीआय सेवा प्रदान करणारी आघाडीची संस्था आहे. 2022 मध्ये या संस्थेने फ्रान्सच्या जलद आणि सुरक्षित ऑनलाइन पेमेंट सिस्टम Lyra सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर 2023 मध्ये युपीआय आणि सिंगापूरच्या PayNow यांनी करारावर स्वाक्षरी केली. ज्यामुळे दोन्ही देशांच्या वापरकर्त्यांना देशाबाहेर व्यवहार करता येतील. UAE, भूतान (Bhutan) आणि नेपाळने (Nepal) आधीच युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारली. एनपीसीआई इंटरनॅशनल युएस (NPCI International US), युरोपियन देश (European Countries) आणि पश्चिम आशियामध्ये (West Asia) युपीआय सेवा विस्तारित करण्यासाठी चर्चा करत आहे.

पॅरिसमध्ये (Paris) भारतीय समुदायाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी जी-20 (G-20) च्या भारताच्या अध्यक्षपदाचा संदर्भ दिला.
प्रथमच एखाद्या देशाच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक कानाकोपऱ्यात दोनशेहून अधिक बैठका झाल्या. जी-20 गट भारताची क्षमता पाहत असल्याचे
पंतप्रधान म्हणाले. यावेळी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) यांचेही पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
हे स्नेहसंबंध केवळ दोन देशांच्या नेत्यांमधील नसून भारत आणि फ्रान्स यांच्यातील अतूट मैत्रीचे ते प्रतिबिंब असल्याचे मोदी म्हणाले.

 

 

Web Title :  PM Narendra Modi | pm narendra modi france visit india upi to be
used in france will start from eiffel tower says pm narendra modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा